Go to full page →

देवाची अतुलनीय प्रीति. WG 9

“देवानें जगावर एवढी प्रीति केली कीं त्यानें आपला एकुलता पुत्र दिला.” त्यानें फक्त मनुष्यांत येऊन रहावें म्हणूनच नव्हें तर त्यांच्या पापाचें ओंझें वाहावें व त्यांच्याबद्दल बळीं म्हणून मरावें म्हणून तो दिला. त्यानें तो पतित प्राण्यांला दिला. मनुष्यप्राण्याचें हित व त्याच्या गरजा ह्यांशीं त्याला एकजीव व्हावयाचें होतें. जो व देव एकच होते त्यानें स्वत:ला मनुष्यप्राण्याशीं कधींहि न तुटणार्‍या अशा बंधनांनीं जोडून घेतलें. प्रभु येशू “त्यांस भाऊ म्हणायास लाजत नाहीं.”2इब्रीयांसपत्र२:११. मनुष्यदेहधारण करणारा व सनातन कालापर्यंत ज्यांचें त्यानें तारण केलें त्याशी एक असलेला तो मनुष्यपुत्र बापाच्या आसनासमोर आपणाबद्दल गेलेला बळी, मध्यस्‍थ व बंधुहि आहे. आणि हें सर्व झालें तें पापामुळें उत्पन्न झालेल्या नीचावस्थेंतून मनुष्य उद्धरिला जावा व त्याच्यामध्यें ईश्‍वराची प्रीति दिसून यावी व पवित्रपणाच्या आनंदाचा वाटा त्यास मिळावा म्हणून झालें. WG 9.3

आपल्या तारणाबद्दल दिलेल्या या किंमतीवरून व आपल्या स्वर्गीय पित्यानें आपणाप्रीत्यर्थ मृत्युमुखीं पडण्यास स्वतांच्या पुत्राला देण्यांत जो अमर्याद स्वार्थत्याग केला त्यावरून ख्रिस्‍तद्वारा आपण कसें व्हावें याविषयीं थोर विचारांची प्रेरणा आपणांमध्यें होईल. जेव्हां पवित्र आत्म्यानें प्रेरीत झालेल्या प्रेषित योहानानें नाशाप्रत जात असलेल्या मनुष्य जातीवर परमेश्‍वराचें किती उच्‍च, किती अगाध, किती व्यापक प्रेम आहे हें पाहिले तेव्हां त्याच्या मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न झाली. ह्या प्रेमाच्या महत्वाचें व मृदुलतेचें वर्णन करण्यास भाषा कोती पडल्याकारणानें जगाला त्यानें तें पहा म्हणून सागितलें. “आम्हांस देवाचीं लेकरें हें नांव मिळालें यांत बापाचें आम्हांवर केवढें प्रीतिदान आहे तें पहा!” ह्यायोगानें मनुष्याची कितीतरी किंमत ठरते तें पहा! देवाच्या आज्ञेच्या उल्लंघनानें मनुष्यें सैतानाची अंकित होतात. ख्रिस्‍तानें लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्तादाखल केलेल्या जीवयज्ञावरिल श्रद्धेनें आदामाचे पुत्र देवाचे पुत्र होतात. मनुष्य स्वभाव धारण करून ख्रिस्‍तानें मनुष्याला उच्चदशेप्रत नेलें आहे. ख्रि‍स्ताशी संयोग पावल्यानें पतितसुद्धां खरोखर “देवाचे पुत्र” या नांवाला शोभतात. WG 10.1

अशा प्रकारची प्रीति खरोखर अतुल आहे. स्वर्गांतील राजाचीं लेकरें! अमुल्य देणगी ! एकाग्रतेनें मनन करण्यासारखाच विषय ! ज्या जगानें त्याजवर प्रीति केली नाहीं त्या जगावरच उलट त्याची अनुपमेय प्रीति ! ह्या विचारामध्यें आत्म्याला आपल्या अंकित करुन घेण्याचें सामर्थ्य आहे; हा विचार मनाला ईश्‍वरी इच्छेच्या ताब्यांत आणूं शकतो. आपण वधस्तंभाच्या दृष्टीनें जों जों ईश्वराच्या शीलाचा अधिकाधिक अभ्यास करूं, जों जों आपण नीति व न्याय यांशीं संमिलित अशी दया, प्रीति, क्षमाशीलता यांचा विचार करूं, आणि आपल्या बहकलेल्या मुलाची आपल्याला जी एक- सारखी कळकळ वाटत असते तीपेक्षांही अधिक जिला मर्यादा नाहीं अशा या प्रीतीचे व दयेचे असंख्य पुरावे स्पष्‍टपणें आपणांपुढें अधिकाधिक येतील तों तों आपण येहोवाला म्हणूं कीं :--- WG 10.2