Go to full page →

मनुष्याच्या आत्म्यास संबोधणारी वाणी. WG 23

सर्व चराचर वस्तूंवर कार्य करीत असलेलें दैवी मन मनुष्याच्या अंत:करणाला सांगत आहे व जिचा त्याजपाशी अभाव आहे अशा एका गोष्‍टीबद्दल त्याचें मनांत अनिर्वाच्य आशा उत्पन्न करीत आहे. ऎहिक वस्तूंनीं त्याच्या आशा तृप्त होऊं शकत नाहिंत. केवळ ज्यांच्या योगानें शांति, समाधान, ख्रिस्‍ताची कृपा व पवित्रपणाचा आनंद हीं प्राप्‍त होतील अशाच गोष्‍टींचा शोध करण्याविषयीं ईश्‍वरी आत्म्या त्यांस मोठ्या कळकळीनें सांगतो. पापापासून होणारी क्षणिक व असमाधानाचीं सुखें सोडून मनुष्यांची मनें त्याच्या (ईश्वराच्या) ठायीं असणार्‍या अमर्याद कृपादानाकडे ओढलीं जावीं म्हणून त्यांना दृश्य व अदृश्य असे उपाय करून आपला तारक एकसारखा करीत आहे. WG 23.2

ह्या जगांतल्या फुटक्या हौदांतून प्यावयास पाणी मिळण्याची व्यर्थ इच्छा बाळगणार्‍या सर्व आत्म्यांस असा दैवी निरोप आहे, कीं “तान्हेलेला येवो, आणि ज्याला पाहिजे तो जीवनाचें पाणी फुकट घेवो.”1प्रगटीकरण२२:२७. WG 23.3

ह्या जगापासून जें कांहीं प्राप्‍त होतें त्यापेक्षां अधिक चांगलें प्राप्‍त व्हावें अशी मनापासून इच्छा बाळगणारे तुम्ही ह्यावरून ओळखा, कीं तुमच्या आत्म्यांची वर सांगितलेली इच्छा हाच देवाचा शब्द आहे. पश्चात्तापाचें दान त्यानें तुम्हांस द्यावें व ख्रिस्ताचें अमर्याद प्रेम व त्याची पूर्ण पवित्रता त्यानें प्रगट करावी असें त्याजजवळ मागा. येशू ख्रिस्‍ताच्या जीवनक्रमांत ईश्‍वरी नियमांचीं मूलतत्वें म्हणजे ईश्‍वरावर मनुष्यमात्रावर प्रेम पूर्णपणें व्यक्‍त झालीं पाहिजेत. परोपकार व निष्काम प्रीति हींच त्याच्या आत्म्याचें जीवन झालीं पाहिजेत. आपलीं अंत:करणें किती पापी आहेत हें पाहण्यासाठीं आम्हांस ख्रिस्‍ताकडे दृष्‍टि फेंकली पाहिजे. ज्या मानानें त्या तारकाचा आपणांवर दिसेल. निकदेमसाला ज्याप्रमाणें वाटलें, कीं आपल्या शीलाची नीतिमत्ता बरोबर असून आपलें जिणें सरळपणाचें आहे, म्हणून साधारण पापी मनुष्याप्रमाणें आपणांस ईश्‍वरापुढें नम्र होण्याचें कारण नाहीं, त्याप्रमाणें आपणही आपली समजूत करून घेत असूं; परंतु आपल्या अंत:करणांत जेव्हां ख्रिस्ताचा प्रकाश पडतो, तेव्हां आपण कितीं अशुद्ध आहों, हें व आपले आपमतलबी हेतु व ज्याच्या योगानें आपल्या आयुष्यक्रमांतील प्रत्येक कर्तव्य अशुद्ध झालें आहे असें जें ईश्वराविषयीम शत्रुत्‍व हीं दृष्‍टोत्पत्तीस दिसून येतात, व असें झाल्यावर आपल्या अंत:करणाचा स्वकपोलक्ल्पित न्यायीपणा म्हणजे खरोखर घाणेरड्या चिंध्याप्रमाणें आहे; व ख्रिस्‍ताचें रक्‍तच केवळ त्यांतील पापकर्दम नाहींसा करून तें स्वच्छ करील, व स्वतांच्या अंत:करणाप्रमाणें तें बनवील असें आपणांस दिसून येईल. WG 23.4

आपल्या अंत:करणावर पडणार्‍या देवाच्या वैभवरुप प्रकाशाचा एक किरण, ख्रिस्‍ताच्या पवित्रपणाचा एखादा ओझरता एक किरण, त्या अंत:करणावर असलेला अशुद्धपणाचा प्रत्येक डाग पूर्णपणें दृश्यमान करतो, व मनुष्याचा शीलाचा घाणेरडेपणा, त्याचें उणेपण, त्याच्या दुष्‍टवासना, त्याचा अविश्‍वासूपणा व त्याची अशुद्धता हीं उघड करून दाखवितो. WG 24.1

ईश्वराच्या नियमांचा भंग करणारीं पापी मनुष्याचीं प्रभुद्रोहाचीं कृत्यें त्याच्या नजरेसमोर आणिलीं जातात व त्यामुळें त्याचा आत्‍मा, कर्माकर्माची झडती घेणार्‍या ईश्‍वरी आत्म्यापुढें कष्‍टी व दु:खी होऊन जातो, व निष्कलंक असें ख्रिस्‍ताचें शील दृष्‍टीस पडलें म्हणजें तो स्वतांलाच दूषण देऊं लागतो. WG 24.2

भविष्यवादि दानिएल यानें जेव्हां दूताचें वैभव पाहीलें, तेव्हां तो स्वताम्च्या दुर्बलतेच्या व अपूर्ण दशेच्या जाणणीमुळें अत्यांत कष्‍टी होऊन गेला. त्या देखाव्यामुळें उत्पन्न होणार्‍या परिणामाचें वर्णन करितांना तो म्हणतो “माझ्याठायीं शक्‍ति राहिली नाहीं, आणि माझें तेज माझ्याठायीं पालटून म्लानव झालें, आणि मी बलहीन झालों.”1दानीएल१०:८. ह्याप्रमाणें कष्‍टी झालेला आत्मा अर्थांतच आपल्या स्वार्थबुद्धीचा तिरस्कार करील, व आपल्या अहंमतेचा त्यास वीट येऊन ख्रिस्ताच्या न्यायीपणाच्याद्वारें ईश्‍वरी नियमाशीं व ख्रिस्ताच्या शीलाशीं अनुसरून असणार्‍या शुद्धतेचा तो शोध करील. WG 25.1

पौलानें म्हटलें आहे, कीं “मी नियमशास्‍त्रांतील नीतिमत्वाविशयीं निर्दोष ठरलेला आहें.”2फिली. ३:६. म्हणजे प्रत्यक्ष माझ्या हातून पापें झालीं नाहींत, तथापि आत्मिक दृष्‍टीनें त्यानें विचार केल्यावर आपण पापी आहों असें त्यास दिसून आलें. नियमशास्‍त्राच्या शब्दार्थाकडे जेव्हां त्यानें पाहिलें, तेव्हां त्यानें नम्र होऊन आपलीं पापे कबूल केलीं. तो म्हणाला “मी नियमशास्‍त्रावांचून होतों, तेव्हां जिवंत होतों, पण आज्ञा आल्यावर पाप सजीव झालें, आणि मी मेलों.”3रोमे७:९. नियमशास्‍त्राच्या भावार्थाकडे त्यानें पाहिल्यावर पापाचें ओंगळ स्वरूप त्याच्या नजरेस आलें, व त्याचा अभिमान नाहींसा झाला. WG 25.2

सर्व पापें सारख्याच महत्वाचीं आहेत असें देव मानींत नाहीं; मनुष्याप्रमाणें त्याच्या दृष्‍टीनेंहि कमी अधिक प्रमाणाच्या पापविषयक गोष्‍टी आहेत. तथापि एखादें वाईट कृत्य मनुष्याच्या दृष्‍टीनें कितीका क्षुल्लक असेना, देवाच्या दृष्‍टीनें तें लहान नाहीं. मनुष्यानें केलेला न्याय सत्यपूर्ण नसून कोता असतो, परंतु देवाच्या घरी सर्व गोष्‍टी जशा त्या खरोखर घडल्या असतील त्याप्रमाणेंच त्यांस किंमत देण्यात येते. दारूबाज मनुष्याचा तिरस्कार करून सांगण्यांत येतें, कीं तें पाप त्याच्या स्वर्गसुखाच्या आड येईल, व गर्व, स्वार्थपरायणता व लोभ यांविषयीं फारसा निषेध करण्यांत येत नाहीं. तथापि हीं पापें मुख्यत्वेंकरून ईश्‍वराविरुद्ध अपराधाची आहेत; कारण तीं त्याच्या शीलामधील औदार्याच्या व पतित न झालेल्या (स्वर्गाचें) सृष्‍टीचें जीवन जें नि:सीम प्रेम त्यांच्या अगदीं विरुद्ध आहेत. एखाद्या शारीरिक बीभात्स पापांत पडलेल्या मनुष्याला आपल्या पापाबद्दल लज्जा व कमीपणा वाटून ख्रिस्‍ताच्या कृपेची तो अपेक्षा करील, परंतु गर्वाला कशाचीही जरूरी भासनार नाहीं, व म्हणून ख्रिस्‍ताचा व त्यानें देऊं केलेल्या असंख्य देणग्यांचा स्वीकार त्याच्या अंत:करणानें करवत नाहीं. WG 25.3

“हें बापा, मज पाप्यावर दया कर”1लुक१८:१३. अशी ज्या जकातदारानें प्रार्थना केली. त्यानें स्वतांला फार दुष्‍ट असें मानिलें व दुसर्‍यांनींहि त्याला तसेंच मानिलें; परंतु आपणांला कशाची जरूरी आहे हें त्यानें ओळखलें व आपल्या पापाच्या ओझ्यानें लज्जित होत्साता परमेश्‍वराजवळ येऊन त्याच्या दयेची अपेक्षा त्यानें केलीं. ईश्वरी आत्म्याचें दयाळूपणाचें कार्य करण्यास व त्याला पापाच्या ओझ्यापासून मुक्त करण्यास त्याचें अंत:करण खुलें होतें. परुश्‍याच्या अभिमानयुक्‍त व जींत स्वतांच्या नीतिमत्तेची रेलचेल स्तुती केली आहे अशा प्रार्थनेनें पवित्र आत्म्याचे सामर्थ्याचा त्याचे अंत:करणांत प्रवेश होण्यास तें किती नालायक आहे हें दाखविलें आहे. ईश्वराशीं फटकून वागल्यामुळें दैवी पावित्र्याच्या अगदीं विरुद्ध असणार्‍या आपल्या पापांची ओळख त्यास नव्हती. त्याला कशाचीहि जरुर भासली नाहीं, अर्थात् त्यास कांहीं मिळालें नाहीं. WG 26.1

जर तुम्हांला आपलीं पापें दिसत असतील तर आपली सुधारणा करून घेण्यास विलंब लावूं नका. ख्रिस्‍ताजवळ येण्यास आपण योग्य नाहीं असें वाटणारे कितीतरी आहेत ? स्वतांच्या प्रयत्नानें सुधारण्याची आशा तुम्ही करता काय ? “खुशी आपलें कातडें किंवा चित्ता आपले ठिपके पालटूं शकेला काय ? मग ज्या तुम्हांस वाईट करण्याची संवय आहे तें उत्तम करूं शकाल ?”2इर्मया१३:२३. आपणांला प्राप्‍त होणारी मदत ईश्‍वराचे ठायीच संभवते. कोणाच्या उपदेशासाठीं अगर एखाद्या सुसंधीसाठीं अगर अधिक पवित्रपणा अंगीं येईपर्यंत आपणांला वाट पहांता कामा नये. आपल्या आपण स्वतां- साठीं कांहींएक करूं शकत नाहीं. आहों असेच आपणांला ख्रिस्तापाशीं गेलें पाहिजें. WG 26.2