Go to full page →

प्रकरण २० वें - मंडळीकरितां साक्ष CChMara 144

शेवट जवळ आला असतांना व जगाला शेवटचा इशारा देताना जे हल्लींच्या सत्याचा स्वीकार करतात त्यांना साक्षीविषयींचा परिणाम व स्वभाव समजून देण्याची फार महत्त्वाची बाब बनते. कारण ही साक्ष देवाने आपल्या योजनेत तिसर्‍य दूताच्या कार्याशी त्याच्या आरंभापासून जाडली आहे. CChMara 144.1

प्राचीन काळीं देव मनुष्याशी प्रेषित व संदेष्टे यांच्याद्वारे बोलला आहे. या दिवसांत तो त्यांशी आपल्या आत्म्याच्या साक्षीद्वारे बोलतो. अगदी कळकळीने देवाने आपल्या लोकांना आपल्या इच्छेविषयीं व ज्या मार्गांनी त्यांनी गेले पाहिजे त्याविषयी पूर्वी कधीही सांगितलें नव्हते असें तो आज सांगत आहे. CChMara 144.2

सेवंथ डे अॅडव्हेटिस्ट लोकांमध्ये चुकणार्‍यांना धमकी व इशारे दिलेले नाहीत, कारण त्यांची जीविते इतर ख्रिस्ती मंडळ्याच्या ख्रिस्ती म्हणविणाच्या लोकांच्या जीवितापेक्षा अधिक दोषी आहेत, पण त्याच्याजवळ मोठा प्रकाश आहे आणि त्यांनी नियमशास्त्र आपल्या अंत:करणात लिहिल्यामुळे देवाचे विशेष निवडलेले लोक आहोत असा दर्जा घेतला आहे. CChMara 144.3

वेगवेगळ्या व्यक्तीसाठी जे सदेश मला देण्यांत आलें तें मी त्याच्यासाठीं त्यांच्या कळकळीच्या विनंतीवरून पुष्कळ बाबींत याकरता लिहिले आहेत. माझे काम प्रगतीमान झाल्यामुळे हें फार महत्त्वाचे होऊन कठीण झाले आहे. 15T 654-662l CChMara 144.4

वीस वर्षांमागे मला जे दर्शविण्यात आलें (म्हणजे १८७१) त्यावेळी सर्वसाधारण तत्त्वे बोलण्याद्वारे व लिहिण्याद्वारे व त्याचवेळी कांहीं व्यर्तीची पापें, चुका व धोके दर्शविण्यासही मार्गदर्शन झाले. अशासाठीं कीं सर्वांना इशारा, धमकी व सल्ला मिळावा. मला असें दिसलें कीं, सर्वांनी आपलीं अंत:करणे तपासून व बारकाईने जीविताचे परीक्षण करून इतरांना चुकांबद्दल इशारे व सल्ला देण्यांत आला आहे. त्या चुका केलेल्या नाहींत हें पाहावे. जर तसे आहे तर त्यांनी समजावे कीं, हें इशारे व धमक्या त्याच्यासाठीच आहेत आणि त्या अशा लागू करून घ्याव्या कीं, त्या त्यांनाच दिलेल्या आहेत. CChMara 144.5

जे ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास पाहातात त्यांच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे देवाने योजिंले आहे. ज्यांना मनापासून आपले कर्तव्य समजून घ्यायला पाहिजे त्या सर्वांच्या प्रार्थनेची सचोटी तो कसाला लावील. तो त्याचे कर्तव्य स्पष्ट करील. त्यांच्या अंत:करणांत जे आहे तें वाढविण्यास तो सर्वाना भरपूर संधि देईल. CChMara 144.6

जे त्याच्या आज्ञा पाळणारे लोक आहेत त्याची सुधारणा करून त्याना प्रभु इशारे देतो तो त्याची पापें उघड करतो व त्यांचे अधर्म उघड करतो. कारण त्याच्यापासून सर्व अधर्म व दुर्बलता घालवून देऊ इच्छितों, अशासाठीं कीं, त्याच्या भयाने त्यांनी पवित्रपणा पूर्ण करावा. देव त्यांची सुधारणा करतो. इशारा देतो व धमकावतो. अशासाठीं कीं त्यांनीसुद्धा पवित्र बनून उच्च पातळीला पोहचावे व शेवटी त्याच्या स्वत:च्या सिंहासनाप्रत जाऊन पोहचावे. CChMara 145.1