Go to full page →

संदेशाविषयीं माहिती नसणें हें निमित्त नाहीं CChMara 147

देवाने आपल्या लोकांना जो प्रकाश दिलेला आहे त्याविरुद्ध पुष्कळ जण जात आहेत. कारण ज्यात इशारा, धमकी व धोका दर्शविला आहे व याविषयींचा प्रकाश व ज्ञान भरलेलें आहे अशीं पुस्तकें तें वाचीत नाहींत. जगाची चिंता, फॅशनची आवड व धर्माची उणीव याद्वारें त्यांचे लक्ष देवाने दिलेल्या प्रकाशापासून वळले आहे कारण चुकांनी भरलेली पुस्तकें व मासिकें सर्व देशांत पसरली आहेत. देवहीनता व नास्तिकपणा चोहोंकडे माजला आहे. देवाच्या सिंहासनापासून येणारा मौल्यवान् प्रकाश मापाखाली लपला आहे. देव आपल्या लोकांना याबद्दल जबाबदार धरील. प्रत्येक प्रकाशाच्या किरणाबद्दल देवाला हिशेब द्यावा लागेल कारण त्यानें तो प्रकाश आपल्या मार्गावर पाडला आहे. मग तो दैवी वाढीसाठीं स्वीकारला आहे किंवा नाकारला आहे कारण आपल्या मनाच्या कलाप्रमाणे चालण्याचे अधिक प्रमाणात कबूल केले आहे. CChMara 147.6

शब्बाथपालन करणाच्या प्रत्येक कुटुंबात संदेशाची माहिती द्यावी व भावांनी त्यांची किंमत ओळखून तें वाचण्यास तयार व्हावे. हीं सदेशाची पुस्तकें मडळींत कमी किंमत करून एकच मालिका ठेवणे योग्य नाहीं. प्रत्येक कुटुंबांतील वाचनालयांत ती असावीत व पुनः पुनः वाचवीत. पुष्कळांना वाचता येतील अशा ठिकाणीं तीं ठेवावीत. 75T 681 CChMara 148.1