Go to full page →

पवित्रशास्त्राचा अभ्यास पद्धतशीर व दक्षतेनें करावा CChMara 152

आईबापांनो, जर तुम्ही तुमच्या मुलांना देवाची सेवा करण्यास व जगांत कांहींतरी चागले करण्यास शिकवाल तर पवित्रशास्त्र तुमचे अभ्यासाचे पुस्तक करा. त्यात सैतानाचे कावे दर्शविले आहेत. हें समाजाला वर उचलणारे असून नैतिक भ्रष्टता दाखवून दुरुस्त करणारे, बरें व वाईट यांतील भेद दर्शविणारे आहे. घरीं किंवा शाळेत जे कांहीं शिकविता येते त्यांत पवित्र शास्त्र में महान् ज्ञानभांडार या नात्याने प्रामुख्याने गणले पाहिजे. पवित्रशास्त्राला हें पहिले स्थान दिल्याने देवाचा मान होऊन तुमच्या मुलांचा पालट होण्यास कार्य करील. या पवित्र ग्रंथात सत्याची खाण व सौंदर्य भरले आहे. आईबाप आपल्या मुलांकरिता तें मनोरंजक करीत नाहीत तर त्याच्यावर दोष येतो. 65T 322; CChMara 152.3

सैतान येशूची परीक्षा घेण्यास आला तेव्हां “असें लिहिले आहे’ या विधान शस्त्राचा उपयोग येशूनें केला. पवित्रशास्त्राची सत्ये शिकविणे हें प्रत्येक आईबापाचे श्रेष्ठ व उत्कृष्ट कार्य आहे. देवाने सांगितलेले सत्य आनंदाने व हर्षाने मुलांपुढे ठेवा. आईबापांनो, रोजच्या जिण्यांत तुम्ही बालकांचा एक वस्तुपाठ होऊन तुम्हांशी त्यांचा संबंध जोडून सहनशीलता दयाळूपणा, प्रीति या गोष्टी आचरणात आणू शकता. त्यांना आवडेल त्याप्रमाणे वागू देऊ नका पण त्यांना दाखवा कीं, देवाच्या वचनाप्रमाणे करणे तुमचे कर्तव्य आहे व त्यांना देवाच्या बोधाप्रमाणे त्याच्यासारखे शील बनविणे हें तुमचे कर्तव्य आहे हें त्याना दिसूं द्या. CChMara 152.4

तुमच्या कुटुंबांत पवित्रशास्त्राचा अभ्यास करण्याच्या बाबतींत शिस्त पाळा, व्यवहारिक बाबीकडे कानाडोळा करा. पण देवाच्या जीवनी भाकरीने आत्म्याचे पोषण करण्याची खात्री बाळगा. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यांत एक तास निदान अर्धा तास खर्च करण्याकडून जो चागला परिणाम दिसून येईल तो कल्पनेच्या पलीकडे असणार. पवित्रशास्त्राला स्वत:चे प्रदर्शन करुं द्या. वेगवेगळ्या परिस्थितींत वेगवेगळ्या वेळी दिलेल्या विषयावर जे सांगण्यांत आलें आहे तें एकत्र करुं द्या. तुमचा घरांतील वर्ग पाहुण्यामुळे व भेटीस येणार्‍यमुळे मोडू नका. वर्ग चालूं असतां तें आलें तर त्यांना त्यात भाग घेण्यास संधि द्या. त्यांना असें दिसूं द्या कीं, जगांतील सुख व लाभ मिळण्यापेक्षा देवाच्या वचनाचे ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे असें तुम्ही समजतां. CChMara 152.5

जर प्रत्येक दिवशीं पवित्रशास्त्राचा अभ्यास दक्षतेने व प्रार्थनापूर्वक केला तर प्रत्येक दिवशीं आम्हांला नवीन, स्पष्ट व उजळ प्रकाशांतील सुंदर सत्ये दिसतील. 7CG 510, 511; CChMara 153.1

प्रभूच्या बोधाप्रमाणे व शीलाप्रमाणे तुमची मुलें बनावी म्हणून तुम्हीं पवित्रशास्त्राला मार्गदर्शक केले पाहिजे. ख्रिस्ताचे शील व जीवित त्यांना गिरविण्यासाठी शिकवा. जर तीं चुकली तर अशा पापाविषय प्रभु काय म्हणतो तें त्यांना वाचून दाखवा. या कार्यात अखंड काळजी व दक्षता यांची गरज आहे. आईबापांनी एका चुकीकडे कानाडोळा केला. शिक्षकानें त्याची दुरुस्ती केली नाहीं तर सर्व शील समतोल न राहातां नासून जाईल. बालकांना शिकवा कीं, त्यांना नवीन हृदय प्राप्त झाले पाहिजे. नवीन गोडी निर्माण झाली पाहिजे. नवीन हेतु निर्माण झाला पाहिजे. ख्रिस्तापासून त्यांना मदत मिळाली पाहिजे. देवाच्या शीलाची त्याच्या वचनांत सांगितल्याप्रमाणे ओळख झाली पाहिजे. 8CG 515; CChMara 153.2