Go to full page →

अपेक्षित पतीच्या अंगच्या गुणांचे संशोधन CChMara 177

विवाहासाठी सिद्ध होण्यापूर्वी ज्याच्याशी आपण विवाहबद्ध होणार तो आपल्या आयुष्याचे चीज करील कीं न करील याचा विचार प्रत्येक स्त्रीनें करावा. त्याच्या चरित्रांत काय काय उलाढाली झालेल्या आहेत ? त्याचें जीवन चरित्र निष्कलंक आहे का? जी प्रीति तो दाखवीत आहे ती उदारपणाची व भारदस्त शीलाची आहे किंवा भावनात्मक लाडाची आहे? आपणास तो सुखी करील अशी त्याच्या भावांत लक्षणे दिसतात का? त्याच्या प्रेमात खरी शांति व आनंद तिला लाभणार आहे काय? आपले व्यक्तीत्व तो तिला ठेवू देईल काय किंवा तिचा न्यायापणा व सद्सद्विवेक बुद्धि ही त्याच्या ताब्यात द्यावी लागतील का ? आपल्या तारणान्याच्या अनुज्ञा परम थोर अशा तिला मानू देईल काय? आपले शरीर आणि आत्मा, विचार आणि हेतु शुद्ध आणि पवित्र राखता येतील काय ? विवाहाच्या नात्यात शिरतांना हें प्रश्न प्रत्येक स्त्रीला तिच्या हितासाठी जिव्हाळ्याचे असतात. CChMara 177.6

शांतीचें सुखावह ऐक्य घडूवन आणण्याची ज्या स्त्रीची इच्छा आहे व जिला भावी लाचारी व दु:ख टाळावयाचे आहे, तिने आपले प्रेम देऊन टाकण्यापूर्वी चौकशी केली पाहिजे कीं, माझ्या प्रियकराला आई आहे का? तिचे शील कसे काय आहे? तिच्या संबधाचे आपले कर्तव्य तो जाणतो काय ? तिच्या इच्छा काय व तिचे सुख कशात आहे हें तो ओळखून आहे काय? जर तो तिला आदरयुक्त बुद्धीनें मान देत नाहीं तर तो आपल्या बायकोला आदर व प्रेम, मायाळूपणा व काळजी दाखवील का ? लग्नाचे नाविन्य संपून गेले तरी तो आपली प्रीति चालूं ठेवील काय? मजकडून जर काहीं उणेपुरे घडले तर तो शांतपणे वागेल का किंवा टीकात्मक, जुलमी व अधिकारयुक्त असा राहील? अस्सल प्रीति पुष्कळ चुकाकडे कानाडोळा करिते; प्रीति त्यात लक्ष घालणार नाहीं. CChMara 178.1

जो मनाने शुद्ध, गुणवान उद्योगशील, ध्येयवादी, प्रामाणिक असा असून देवावर प्रीति करून त्याचे भय बाळगणारा आहे, अशालाच तरुण स्त्रीने आपल्या जीवाचा सोबती करून घ्यावा. CChMara 178.2

अपूज्य भावना बाळगणार्‍यला टाळा. आळसात रमणारा वे पवित्र गोष्टींची टिंगल करणारा यापासून दूर राहा. पोकळ भाषा करणार्‍यची अगर दारूला स्पर्श करणार्‍यांची संगत धरूं नका. देवाविषयींची आपली जबाबदारी न ओळखणाच्याकडून आलेली मागणी पत्करू नका. देवावर प्रीति नसलेला व त्याचे सद्भय न धरणारा आणि वास्तविक न्यायधर्माविषयीं अंधकारांत वावरणार्‍या अशा पुरुषाची ओळख कितीहि आकर्षक असली तरी ती सोडून द्या. हें धाडसाचे कार्य करण्यासाठी बुद्धीला सात्विक करणारे सत्यच तुम्हांला धैर्य पुरविल. एकाद्या मित्राचा दुबळेपणा व त्याचे अज्ञान नेहमीच वागवून घेणें चालून जाई. परंतु त्याच्या दुर्गुणांची गय कदापि करितां येणार नाहीं. CChMara 178.3