Go to full page →

विवाहाचा विचार करणार्‍यांस सावधगिरीच्या सूचना CChMara 182

तरुण मंडळी सर्वदा मनोविकारावरच वाजवीपेक्षा अधिक विसंबून राहाते. सहजासहजी त्यांनी वाहवत जाऊ नये अगर प्रियकाराच्या बाह्य आकर्षणाला सहसा भाळून जाऊ नये. लग्नापूर्वीचा व मागणीनंतरचा जो प्रेमाराधण्याचा काळ असतो तो साप्रत काळीं अति फसवेगिरीचा व ढोगांचा होऊन गेलेला दिसत आहे. या काळांत प्रभूपेक्षा अंत:करणाच्या शत्रूला अधिक कार्य करावयाचे असतें. जर अक्कल हुशारीची कुठे गरज असेल तर ती ह्या ठिकाणीच असतें; परंतु वस्तुस्थित कांहीं वेगळीच दिसून येते, अक्कल हुशारीचे या प्रकरणीं क्वचितच चालते. CChMara 182.1

महारोगाच्या संपर्काला जसे आम्ही टाळतो तसेच मनकल्पित गोष्टींना व प्रेमाने विव्हळत होणार्‍य लहरीपासून दूर राहावयास पाहिजे. आजच्या काळीं जगांत पुष्कळशा तरुण पुरुषांच्या व स्त्रियांच्या अंगी सद्गुणाचा अभाव दिसून येतो, म्हणून मोठी सावधगिरी राखणे अवश्य आहे. इतर इच्छित गुण जरी कमी पडले तरी ज्यांनी आपले सत्शील राखिलेले आहे त्याचे नैतिक मोल भारी असते. CChMara 182.2

तरुणाच्या धार्मिक अनुभवात हीन हळव्या मनाचा बराचसा प्रादुर्भाव आजच्या काळी जगांत दिसून येतो. माझ्या भगिनी, तू आपले रुपांतर करून घ्यावे अशी देवाची इच्छा आहे. आपल्या प्रेमभावना उच्च दर्जाची कर अशी मी काकुळतीची विनती करिते आपल्या मानसिक व शारीरिक शक्तीचा आपल्या उद्धारकाच्या सेवेसाठी विनियोग कर. त्यानेच तुला खंडून घेतले आहे. आपले विचार व आपल्या भावना अशा शुद्ध ठेव कीं तुला आपली सर्व कामे देवामध्ये करून टाकितां येतील. CChMara 182.3

मागणीच्या काळांत जे आपल्या रात्रींचा फार मोठा भाग खर्ची घालतात त्यावर सैतानाचे दृत पाळत ठेवीत राहातात. जर त्याचे डोळे उघडे असतें तर त्यांना दिसून आलें असतें कीं, त्यांच्या शब्दांची व त्यांच्या कृत्यांची दूत नोंद करीत आहेत. आरोग्याच्या व विनयशीलतेच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. मागणीच्या काळांत लग्नापूर्वी जो काळ खर्चिला जातो तोच लग्न झाल्यावर घालण्यात येईल तर तें अधिक संयुक्तिक होईल. परंतु साधारणत: असें दिसून येते कीं मागणीच्या काळांत जी निष्ठा दर्शविली जाते ती संपून जाते. CChMara 182.4

कोणकोणत्या घटना हाती घ्यावयाच्या हें सैतानाला नक्कीच ठाऊक असतें, आत्म्यांचा नाश करावा म्हणून तो आपल्या अतिदुष्ट चतुराईने व निरनिराळ्या युक्त्यांनी आपले घातकी जाळे बनवित राहातो. त्याच्या प्रत्येक उपायावर त्याची नजर असतें. अनेक सूचना पुढे मांडण्यात येतात. देवाच्या वचनांतून मिळणाच्या सूचनापेक्षां सैतानी सूचनाच अवलंबण्यात येतात हें घातकी जाळे अशा चतुराईने बनविलेले असतें कीं त्यात घुसून अनेक दु:खाचे भागीदार होतात. परिणामी मानवतेची सर्वत्र धुळबाणी उडालेली आम्ही पाहातों. CChMara 182.5