Go to full page →

प्रकरण ३१ वें - नवरा व बायको यांतील संबंध CChMara 196

विवाहसंबंध हा देवाने घालून दिलेला पवित्र संस्कार असें जे लेखितात व देवाच्या पवित्र नियमाने ज्याचे संगोपन होत आहे असें जे मानितात, त्यांच्यावर बुद्धिसामर्थ्याचा पगडा असतो. CChMara 196.1

कोणत्याहि प्रकारच्या लोकांवर येशूनें ब्रह्मचर्यवृत्त लादलेले नाहीं. विवाह नात्यांतील पवित्रता नष्ट करण्यासाठी तो आलेला नव्हता उलट त्याची प्रशंसा करून त्याची मूळ पवित्रता सबळ करण्यासाठी तो आला होता. पवित्र आणि नि:स्वार्थी प्रीतीची कौटुंबिक नात्यात जोर पाहन तो प्रसन्न होत असे. CChMara 196.2