Go to full page →

मोलाने तुम्हांला विकत घेतले आहे CChMara 200

क्षुद्र मनोविकार शरीरात स्थान करून राहातात व शरीराद्वारे आपले कार्य करतात. “देह” अगर “देहस्वभाव” अगर “ऐहिक वासना” यांचा नीचतेकडे ओढा असून ती स्वभावात आचारभ्रष्ट असतात. देह स्वत: होऊन देवाच्या इच्छेविरुद्ध वागू शकत नाहीं. देहाला त्याच्या विकारासह व विषयभावनासह वधस्तंभी खिळून टाका अशी आम्हांला आज्ञा आहे. तें आम्हीं कसे काय करावे ? शरीरावर आम्हीं दु:खाचे आघात करावेत कीं काय ? नाहीं; परंतु पाप करण्याचा मोह मारून टाकावा. भ्रष्ट विचारसरणी काढून टाका. प्रत्येक विचार खिस्ताच्या कह्यात आणून ठेविला पाहिजे. सर्व वैषयिक नाद आत्म्याच्या मारदस्त सामर्थ्यापुढे लीन झाले पाहिजेत. देवाच्या प्रीतीची थोर सत्ता चालली पाहिजे. खिस्ताने अविभाज्य सिंहासन धारण केले पाहिजे. आमची शरीरे ही त्यानें विकत घेतलेली मालमत्ता अशीं गणली पाहिजेत. आमच्या शरीराचे अवयव त्याच्या न्यायत्वाची साधने बनली पाहिजेत. 1 AH 121-128. CChMara 200.3