Go to full page →

मातेचा कर्तव्यभार केव्हां कमी करावा. CChMara 203

बाळंतपणापूर्वीच्या आणि नंतरच्या स्त्रीचारित्र्यात फारसा फरक होत नाही असा एक सर्वसाधारण चुकीचा समज असतो. ह्या महत्वाच्या वेळी मातेचा कार्यभार कमी करावयास पाहिजे. तिच्या प्रकृतींत मोठमोठाले फेरफार होत असतात. रक्ताचा फार मोठा पुरवठा लागतों. पौष्टिक अन्नाचा अधिक पुरवठा केल्याने तसला पुरवठा साध्य होतो. तिला भरपूर पौष्टिक अन्न मिळ मिळाले नाहीं तर तिला आपले प्रकृति सामर्थ्य राखता येणार नाही व त्यामुळे तिच्या बाळाचे जीवन सामर्थ्य नष्ट होऊन जाईल. CChMara 203.4

तिच्या कपड्याकडे सुद्धा लक्ष द्यावयास पाहिजे. तिला थडी वारा भासू नये म्हणून काळजी वाहिली पाहिजे. भरपूर कपड्यांच्या अभावीं तिला आपल्या जोमदार प्रकृतीचा निष्कारण फायदा घ्यावयास लावू नये. आईला भरपूर, चांगले आणि पौष्टिक खाद्य मिळाले नाही तर तिला भरपूर व चांगल्या प्रतीचे रक्त मिळणार नाहीं. तिचे रक्ताभिसरण दुबळे होईल व तीच उणीव मुलांत आढळून येईल. प्रकृतीच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट रक्ताचा जो संग्रह अवश्य असतो तो मुलालो असाध्य होऊन जाईल. चांगल्या व उबदार कपड्यांवर आणि पौष्टिक अन्नाच्या पुरवठ्यावर आईची व मुलाची प्रगति अवलंबून असते. CChMara 203.5