Go to full page →

कलीसिया के लिए परामर्श CChMara 1

उपोद्घात CChMara 3

सदर्न एशिया डिव्हीजनमधील सेव्हंथ-डे अॅडव्हेंटिस्ट मोहीम वाढत असल्यामुळे, सर्व जगांतील मंडळीला आशीर्वादित झालेले व बोधकारक ठरवलेले असें “मंडळीच्या साक्षीवादाचे ग्रंथ” वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍य व लिहीणार्‍य सभासदांनी मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या “साक्षीवादाच्या” नऊ ग्रंथातील माहिती व संदेशाच्या आत्म्याने लिहीलेली दुसरी सतर पुस्तके प्रत्येक भाषेंत छापणे अशक्य आहे. तरीपण या ग्रंथात दिलेल्या सल्ल्यातून निवडून घेतलेला भाग मंहळीच्या महान् सेवेसाठी व व्यवहारिक मदतीसाठी उपयोगी पडेल. CChMara 3.1

या ग्रंथातील ६६ अध्यायांत एकत्र केलेल्या माहितीचे निवड कार्य हें डिव्हीजनमधील मोठ्या समितीचे व एलन जी. व्हाईट प्रकाशनास जबाबदार असलेल्या वॉशिंग्टन डी.सी. येथील जगांतील मुख्य कचेरीतील विश्वस्त मंडळाचे आहे. CChMara 3.2

एलन जी. व्हाईट यांच्या अनेक ग्रंथांतून घेतलेली विस्तृत माहिती एका ग्रथांत संकलीत करून भाषांतर करणे व छापणे हें तसदीचे काम आहे. जागेच्या अभावी महत्वाच्या विषयांवरील फक्त अत्यावश्यकतेचीच माहिती यांत समाविष्ट केली आहे. तरी यांतही अनेक विषयांचा मालिका येत आहे. कांही बाबींत विखुरलेल्या माहितीतून घेतलेली कांही कलमें दिली आहेत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ज्या पुस्तकांतून माहिती गोळा केली आहे त्या पुस्तकांचा आधार संक्षिप्तरूपाने दिला आहे. खोडलेली वाक्ये व कलमें दर्शविण्याचा प्रयत्न येथे केलेला नाही. CChMara 3.3

१९५५ साली पुणे येथे भरलेल्या ‘सेमिनर एक्स्टेनान’ स्कूलमध्ये डिव्हीजनमधून आलेल्या सर्व कामगारांच्या विनंतीवरून या ग्रंथासाठी परिचय तयार केलेला आहे. त्याद्वारे एलन जी. व्हाईट यांचा मंडळीशी आरंभापासून तो १९१५ मधील त्याच्या मरणापर्यंत जो संबंध आला त्याशीं व भविष्यात्मक देणगींचे कार्याशी वाचकांचा परिचय व्हावा. ह्या परिचयाचा या ग्रंथातील मुख्य माहितीशी गोंधळ करूं नये. CChMara 3.4

इतका वेळ जे मोठ्या आतुरतेने हा ग्रंथ तयार होण्याची वाट पहात होतें त्याच्यासाठी हा ग्रंथ उपलब्ध होत आहे म्हणून आम्हांस आनंद व संतोष होत आहे. त्याद्वारे वाचकांची अॅडव्हेंट निरोपांतील सत्यांत पक्की खात्री व्हावी व त्याचा खिस्ती अनुभव वाढावा व आपला प्रभू येईल त्या दिवसांतील विजयाची आशा उंचावली जावी अशी सदर्न एशिया डिव्हीजनमधील पुढाऱ्यांची व एलन जी. व्हाईट प्रकाशन विश्वस्त मंडळाची मनापासून प्रार्थना आहे. CChMara 3.5

- एलन जी. व्हाईट प्रकाशन
विश्वस्त मंडळ