Go to full page →

पुष्कळशा रोगांचे व आजारीपणाचें कारण CChMara 304

मांस हें कधीच उत्कृष्ट खाद्य नव्हते; परंतु जनावरांमध्ये आजारांची इतकी झपाट्यानें वाढ होत आहे कीं मासाचे भक्षण हें दुपटीने अनुचित असें होऊन गेले आहे. जनावरांना जिवंतपणी जर पाहिलें व आपण खातो तें मास कोणत्या प्रकारचे हें जर नजरेपुढे आणिलें तर तिरस्काराने तें त्याचा धिक्कार करितील. क्षय व कॅन्सरच्या जंतूंनी भरलेलें मास लोक निरंतर भक्षण करीत असतात. अशा प्रकारे क्षय, कॅन्सर व दुसरे विघातक आजार यांचा आम्हांला संपर्क होत असतो. 3MH 313; CChMara 304.4