Go to full page →

दृढनिश्चयपूर्वक चिकटून राहाण्याचा आग्रह CChMara 310

सेव्हंथ-डे अँडव्हेंटिस्ट मंडळी क्रांतिकारक सत्याचा प्रचार करीत आहे. आरोग्य सुधारक कार्याविषयीं एकशे चाळीसांहून अधिक वर्षांमागें (१८६३ सालीं) प्रभुकडून आम्हांला विशेष प्रकाश प्राप्त झाला; पण त्या प्रकाशांत आम्ही कसे काय वावरत आहो? प्रभुनं दिलेल्या सल्लामसलतीचा किती तरी जणांनीं धिक्कार केला आहे ! आम्हांला मिळालेल्या प्रकाशाच्या प्रमाणांत त्याचे लोक म्हणून आम्ही प्रगति करावयास पाहिजे. आरोग्य सुधारणेची तत्त्वे जाणून त्यांचा आदरयुक्त स्वीकार करणे हें आमचे कर्तव्य आहे. अवांतर सर्व लोकांपेक्षा मिताहर या प्रकरणी आम्ही अधिक प्रगत असावयास पाहिजे. तथापि आम्हातील सुशिक्षण घेतलेले मंडळीचे सभासद आणि प्रत्यक्ष दीक्षितसुद्धा या विषयावर प्रभूने दिलेल्या प्रकाशाविषयीं क्वचितच पर्वा करितात. त्यांना वाटेल तें खातात वे वाटेल तसे वागतात. CChMara 310.2

आमच्या ह्या कार्यात शिक्षक व पुढारी म्हणून जे राहतात, त्यांनी शास्त्राचा आधार घेऊन आरोग्य सुधारणेविषयींच्या मतांना निष्ठापूर्वक चिकटून राहावे आणि ज्या कोणाचा असा विश्वास आहे कीं आपण पृथ्वीच्या इतिहासांतील शेवटच्या काळांत जगत आहों त्यांना तशी स्पष्ट साक्ष द्यावी. जे देवाची सेवा करितात व जे स्वत:साठीच जगतात यामध्ये काय अंतर आहे हें दाखविण्यांत यावे. या संदेशाविषयी आम्हांला पूर्वी दिलेली तत्त्वे जशी महत्त्वाचीं होतीं तीं आजही तशीच आहेत व तत्काळीं ती जशी निष्ठापूर्वक मान्य केलेली होती तशीच ती आजही केली पाहिजेत. अन्नासंबंध दिलेले ज्ञान कित्येकांनी कधीच स्वीकारलें नाहीं. आता अशी वेळ आलेली आहे कीं दिवठणीवरचा उजेड उघड ठिकाणी ठेवून त्याला त्याची प्रकाश-किरणे प्रज्वलित करूं द्यावीत. CChMara 310.3

आरोग्यकारक जीवनाचीं मूलभूत तत्त्वे प्रत्येकांसाठीं व देवाच्या लोकांसाठी फार उपयुक्त आहेत. आरोग्य-सुधारणेचा संदेश मला प्रथमच मिळाला तेव्हां मी प्रकृतीने अशक्त व दुबळी होतें व वारंवार मला मूच्र्छा येत असत. मला साहाय्य मिळावे म्हणून देवाची याचना करीत असें आणि त्यानें आरोग्य-सुधारणेचा महान विषय मजपुढे मांडिला. त्यानें मला असें शिक्षण दिले कीं जे कोणी माझ्या आज्ञा मानितात त्यांनी माझ्या पवित्र सहवासात यावे आणि आपल्या खाण्यापिण्यात मिताहारी होऊन त्याची सेवा करण्यासाठी आपापलीं मनें व शरीरें अत्यंत सुव्यवस्थित अर्शी ठेविली पाहिजेत. हें ज्ञान मला अत्यंत आशीर्वादाचे झाले. आरोग्य-सुधारक म्हणून मी स्वत:ला सादर केले व या कामीं प्रभु मला सबळ करील असें मी समजून घेतले माझ्या तारुण्याच्या दिवसांत जी माझी प्रकृति होती तिच्यापेक्षा आज मी वयस्कर असतांही ती अधिक चागली आहे. CChMara 310.4

माझ्या लिखाणांतून निवेदित केलेल्या आरोग्यविषयक तत्त्वांप्रमाणे मी वागत नाहीं असा कित्येकांचा आक्षेप आहे, असें मला कळविण्यात आलें. एवढेच मला सांगता येईल कीं मी निष्ठापूर्वक आरोग्यसुधारक आहे. हें सत्य आहे असें माझ्या कुटुंबांतील मंडळीला ठाऊक आहे. CChMara 311.1