Go to full page →

सैतानाची अत्यंत घातकी करामत CChMara 316

मानवी वंशाली अत्यंत अपायकारक मार्ग योजण्यासाठीं सैतानानें पतित दूतगणांना एकत्रित केले, एकामागून एक युक्त्याप्रयुक्त्या सुचविण्यात आल्या. अखेरीस सैतानालाच एक शक्कल मिळाली. त्यानें अशी योजना आखली कीं, द्राक्षलत्तेची फळें, तसेच गहू व इतर गोष्टी ज्या देवाने अन्न म्हणून दिलेल्या होत्या, त्या घेऊन जेणेकडून मानवाच्या शारीरिक, मानसिक वे नैतिक शक्तींचा नाश होईल अशीं विषारी द्रव्ये बनवावीत व अशाप्रकारे मानवांच्या ज्ञानेंद्रियांचा त्यानें संपूर्ण ताबा घ्यावा. मद्यपानाने मानवांना तो सर्व त-हेच्या गुन्हेगारीत ओढील भ्रष्ट भुकेच्या नादी लागून सर्व जग भ्रष्ट होऊन जाईल. मानवांत मद्यपानाची आवड उत्पन्न करून त्यांना अधिकाधिक नीचावस्थेत आणून सोडील. 412; CChMara 316.5

मद्यपान, धुम्रपान आणि चहा-कॉफीच्या नादी लावून सैतान संबंध जगाला बंदिस्त करीत आहे. शुद्ध राखण्यासाठी देवाने दिलेल्या मनाला गुगी आणणाच्या द्रव्यांनी भ्रष्ट करण्यांत येतं. बन्यावाईटात फरक काय ह्याचे बुद्धीला अंत:पर आकलन होत नाहीं. शत्रूने ताबा घेतलेला असतो. मानवाला वेडावून सोडेल अशी किंमत भरून त्यानें आपली बुद्धि गहाण टाकिलेली असतें. योग्य काय त्याचे त्याला भानच उरलेले नसतें. 5Ev. 529; CChMara 317.1

उत्पन्नकर्त्यानें सढळ हस्ते मानवाला आपल्या औदर्याच्या देणग्या दिलेल्या आहेत. जर ह्या ईश्वरदत्त देणग्यांचा चतुराईने व नेमस्तपणाने विनियोग केला असतां तर पृथ्वीवरील गरिबी, आजार व संकटें बहुतेक नाहींशी होऊन गेली असती परंतु अरेरे, देवाचे हें आशीर्वाद जाऊन दष्टाईचे शापच मानवाच्या पदरात पडलेले आहेत CChMara 317.2

जमिनींतील उत्पन्नांचे मादक पदार्थ बनविणारे जे आहेत त्यांच्या इतका देवाच्या मौल्यवान् दानांचा भ्रष्टाचार व दुरुपयोग करून अधिक मोठा गुन्हेगार वर्ग दुसरा कोणताच मिळणार आहे. पौष्टिक धान्ये, आरोग्यवाहक व रुचकर फळें यातून मादक पेये बनविण्यात येतात व ती ज्ञानेंद्रियांना भ्रष्ट आणि बुद्धीला वेडपड करितात. या विषारी पेयांचा असा परिणाम होतो कीं, हजारों कुटुंबे सुखसमाधानाला आणि जीवनातील अवश्य गोष्टींना अंतरतात, त्यामुळे बडाळीं व गुन्हेगारी फार वाढते आणि शेकडों लाचार प्राण्यांवर आजार व मरण हीं झडप घालतात व तें दारूड्याच्या मरणाने नाश पावतात. 6GW 385, 386; CChMara 317.3