Go to full page →

कोणत्याही मनुष्याला दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं CChMara 349

ख्रिस्ताने आम्हापुढे दोन धनी सादर केलेले आहेत, देव आणि जग आणि आम्हांस स्पष्टच करून सांगितलें कीं दोघांनाही चाकरी करणे हें अगदी अशक्य आहे. जर जगावरील आवडीचा व प्रेमाचा अधिक जोर असेल तर ज्या गोष्टी इतर सर्व गोष्टींपेक्षा लायक अशा आहेत त्या आम्हांला आवडणार नाहीत. जगावरच्या लोभात देवांची प्रीति नसते. आणि जागिक गोष्टीखाली आमचे अति थोर हितसंबंध दडपले जातात. आ प्रकारे आमच्या प्रेमात व भक्तिभावनांत जगिक गोष्टींपेक्षा देवाला अधिक थोर स्थान मिळणार नाही. CChMara 349.2

अरण्यात ख्रिस्ताच्या परीक्षेच्या वेळी सैतान जसा ख्रिस्ताशी वागला त्यापेणा तो मानवांशी अधिक सावधगिरीने वागत असतो कारण अरण्यांतील त्याचा सामना पराभूत झालेला होता. तो एक पराजित शत्रु आहे. तो सरळ मानवाकडे येत नाही ना बाह्य स्वरूपात भक्तिनिष्ठा मागत नाही. जगांतील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यावर आवड असावी एवढीच त्याची मागणी आहे. मन व आवडी हस्तगत करण्यांत जर त्याला यश आलें तर स्वर्गीय आकर्षणे निस्तेज होऊन जातील मानवाने त्याच्या फसवेगिरीच्या मोहजाळ्यात अडकून पडावे जगावर लोभ करावा, पदव्या व प्रतिष्ठा यांच्या नादी लागावे पैशावर प्रेम करावे आणि ऐहिक संपत्तीत त्यानें आपले तनमन ठेवावे एवढेच सैतान मानवापासून मागत आहे. ऐवढे त्यानें साधले तर ख्रिस्तापासून त्यानें जे मागितले होतें तें सर्व त्याला मिळते. CChMara 349.3