Go to full page →

दोन सैन्यें CChMara 369

एका भयकर झगड्यात दोन सैन्ये गुंतलेली मला दर्शनात दिसून आली. एक सैन्य जगांतील सन्मान चिन्हांच्या झेंड्याखाली व दुसरे इम्मानुएल राजाच्या रक्तसचित झेंड्याखाली चाललेले होतें. झगडा चालूं असताना प्रभूच्या सैन्यातून टोळ्यामागून टोळी शत्रूच्या सैन्याला जाऊन मिळत होती. व तसेच शत्रु सैनिकांच्या झुंडीच्या झुंडी ईश्वरी लोक सैन्याच्या अधिपतीकडे येत होत्या. हें करताना निशाणांची निशाणे धुळीत पायाखाली तुडविण्यात येत होती. स्वर्गामधून एक दिव्यदूत उडता उडता पुष्कळांना इम्मानुएलचीं निशाणे पुरवीत होता. इकडे पराक्रमी अधिपती जोराने मोठ्या वाणीत सांगत होता कीं शिस्तीत येऊन उभे रहा जे सेवाच्या आज्ञांशी व ख्रिस्ताच्या साक्षीशी निष्ठ आहेत त्यांनी आपापल्या स्थानावर आता स्थिर व्हावे त्यांच्यातून बाहेर पडा व अलिप्त व्हा. अशुद्धला स्पर्श करूं नका म्हणजे मी तुमचा स्वीकार करीन, मी तुमचा पिता व तुम्ही माझ्या पुत्रकन्या व्हाल. पराक्रमी शत्रुच्याविरूद्ध प्रभूला साहाय्य देण्यासाठी सर्वांनी यावे.” CChMara 369.2

ख्रिस्ती मंडळीने आता लढाऊ बाणा घ्यावयाचा आहे मध्यान्ही रात्रींच्या अंधकारार्तल जगाला आम्हांला तोंड द्यावयाचे आहे तें बहुतेक सर्व मूर्तिपूजेशी जडलेले आहेत. परंतु असा दिवस येत आहे कीं युद्ध जिंकले जाईल व विजय मिळविला जाईल. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर देवाची इच्छा प्रस्थापित करावयाची आहे. नंतर मग राष्ट्रांना स्वर्गीय कायद्याशिवाय दुसरा कायदा असणार नाही. सर्व एकच कुटुंब राहील-सुखी, एकत्रित, स्तुति स्तोत्रांच्या वस्त्रानी अलंकारित, ख्रिस्ताच्या न्यायत्वाच्या झग्याने विभुषित असें तें कुटुंब होईल. सर्व निसर्ग आपल्या सौंदर्याने देवाची निरंतर स्तुति व आराधना करीत राहील. जग हें स्वर्गीय प्रकाशाने प्रफुल्लीत होईल. वर्ष कालक्रमणे आनंदमय होतील. चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाप्रत होईल व सूर्याचा प्रकाश आहे त्यापेक्षा सातपट अधिक होईल. त्या दृश्यावर प्रभाताचे तारे सर्व मिळून संगीत करतील आणि देवपत्र आनंदाने बागड लागतील व त्याच वेळी देव व खिस्त एकत्रितपणे घोषणा करतील कीं, “यापुढे पाप नाही अगर मरणही नाही.” CChMara 369.3

हेच दृश्य मला दाखविण्यांत आलें आहे. परंतु मंडळीला दृश्य व अदृश्य शत्रुविरुध्द लढा करावयास पाहिजे आहे मानव स्वरूपामध्ये सैतानाचे प्रतिनिधि भुमिवर आहेत. सैन्यांच्या प्रभूला विरोध करण्याचे मानवांनी एकत्रित होऊन विचार केलेला आहे. दयासनासमोरील मध्यस्थी करण्याचे सोडून देईपर्यंत आणि प्रतिकाराचे कार्य ख्रिस्त हातीं घेईपर्यंत मानवाचे हें संघर्ष चालूच राहतील. सैतानाचे प्रतिनिधी प्रत्येक शहरांतून असतात आणि देवाच्या नियमशास्त्राला विरोध करणार्‍या टोळ्या बनविण्यात तें गुंतलेले असतात. स्वत:ला संत म्हणविणारे आणि अविश्वासूपणाचा विडा उचललेले ह्या टोळ्यांमध्ये सामील होतात. देवाच्या लोकांनी दुबळेपणात रेंगाळण्याची ही वेळ नाही. क्षणभरसुध्दा आमच्याने बेसावध राहता कामा नये. CChMara 369.4