Go to full page →

अंत जवळ आला आहे CChMara 372

आमच्या जगांत ख्रिस्ताचे आगमन फारसे विलंबित राहणार नाही. प्रत्येक सदेशाचा हा मुख्य विषय असावा. CChMara 372.4

सावरून धरणारी देवाची जगांतून आतासुध्दा काढून घेण्यात येत आहे. प्रचंड तुफाने, वादळे, आगी व पूर ही समुद्रावरची व खुष्कीच्या मार्गावरची संकट, एकामागून एक झपाट्यानें उठत आहेत. विज्ञान शास्त्र ह्या सर्वांची कारणमिमांसा करण्याचा प्रयत्न करीत आहे. देवाच्या पुत्राचे आगमन नजिक आल्याची दाट चिन्हें दृष्टोत्पत्तीस येत आहेत. तसे खरे कारण न देता दुसर्‍यच कारणांमुळे हें घडत आहे. असें दर्शविण्यात येते. रखवालदार दूत चार वार्‍यना थोपवून धरीत आहेत हें मानवांना कळू शकत नाही. देवाच्या सेवकावर शिक्क पडेपर्यंत तें चारही वारे वाहावयाचे नाहीत परंतु जेव्हां परमेश्वर आपल्या दृतांना तें वारे सोडण्याची आज्ञा येईल तेव्हां असा कांही कलह भडकेल कीं कोणत्याही लेखणीला त्या देखाव्याचे चित्र रेखाटता येणार नाही. CChMara 373.1

जर पडदा बाजूला सारण्यांत आला. देवाचे हेतु जर तुमच्या ध्यानात आलें, जर शापित जगावर परमेश्वराचे न्याय काय तें कळून आलें व तुमचा स्वत:चाच कल काय तो तुम्हांला दिसून आला तर तुमच्या स्वत:च्या व तुमच्या बधुगणाच्या भीतीने तुम्ही थरारून जाल. भग्न हृदयाच्या चितानी आस्थेवाईक प्रार्थना वर देवाकडे जातील. आपल्या धर्मभ्रष्टतेबद्दल कबुली देऊन अगणाच्या व वेदीच्या दरम्यान तुम्ही शोक करीत राहाल. CChMara 373.2