Go to full page →

ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या झग्याने झांकलेले CChMara 383

जेव्हा देवाचे लोक आत्म्यांच्या खिन्नतेने त्याच्यासमोर अंत:करणाच्या शुद्धतेसाठी याचना करीत उभे राहतील तेव्हां आज्ञा देण्यांत येईल कीं त्याच्यावरची “मलीन वस्त्रे काढा” व पुढे उत्तेजनदायी शब्द निघतील कीं, “पाहा, मी तुझा अधर्म तुजपासून दूर केला आहे. मी तुला उंची पोषाख घालीत आहे.” कसोटीत लोटलेले मोहात गाठलेले तरी पण ईश्वराची निष्ठावंत मुलें असलेली अशांवर ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा निष्कलक झगा घालण्यात येईल. तुच्छ लेखलेल्यांना उंची गौरवी पोषाख चढविण्यात येईल व तो कधीही जगाच्या भ्रष्टतेने कलकित होणार नाही. त्यांची नावें कोकर्‍यांच्या जीवन पुस्तकात घातलेली आणि सर्व युगांतील निष्ठजनांच्या मालिकेत नमूद केलेली राहतील. फसवेगिरीच्या कपटी धोरणे त्यांनी झुगारून दिली. अजगराच्या ओरडण्याने तें आपल्या निष्ठेपासून दुरावले नाहीत. आता तें मोहकाच्या कुयुक्त्यापासून कायमचे सुरक्षित आहेत. त्यांची पापे पापांच्या उत्पादकावरच लादण्यात आलेली आहेत. CChMara 383.4

नुसती क्षमा करून अवशिष्ट मंडळीचा स्वीकार केलेला नसून उलट तिचा सन्मान करण्यांत आला आहे. त्यांच्या मस्तकी “स्वच्छ मंदील’ घालण्यात आलें. देवाकरीता तें अधिपति व याजक व्हावयाचे आहेत.या मंडळीवर सैतान आपले दोषारोप आग्रहाने घालीत असतां व त्यांचा घात करण्याचा यत्न करीत असताना दिवदूत अदृष्यपणे मागेपुढे होतेंच व जिवंत देवाचा शिक्कामोर्तब तें त्यांच्यावर करीत होतें ज्यांच्या कपाळांवर पित्याचे नाव लिहीलेले आहे तें हेच लोक कोकच्यासह सियोन डोंगरावर उभे आहेत. सिंहासनासमोर तें नवीन गीत गातात पृथ्वीतून जे एकशे चवेचाळीस हजार मुक्त केलेले होतें त्यांच्या व्यतिरीक्त तें गायन कोणालाही शिकता येणार नाही. जेथे कोठे कोकरा जातो तेथें त्याच्यामागे जाणारे हें आहेत. देवासाठी व कोकच्यासाठी प्रत्रम फळ असें तें मनुष्यांतून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही; तें निष्कलंक आहेत.” प्रकटीकरण १४:४,५. CChMara 384.1