Go to full page →

“शब्बाथ दिवशी सत्कर्म करणे योग्य आहे” CChMara 50

घरांत व मंडळींत सेवेची वृत्ति दाखवली पाहिजे. त्यानें आपल्याला कामासाठीं सहा दिवस दिले आहेत. त्यानेच सातव्या दिवसाला आशीर्वाद देऊन व पवित्र करून स्वत:करता वेगळा केला आहे. या दिवशी तो विशेष प्रकारे जे त्याच्या सेवेसाठी समर्पण करतील त्यांना आशीर्वाद देईल. CChMara 50.4

सर्व स्वर्ग शब्बाथ पाळीत आहे, पण निष्क्रिय व उदासपणे नव्हें. या दिवशी प्रत्येक आत्म्याची शक्ति जागृत व्हावी कारण आमचा तारणारा देव याची आम्ही भेट घेणार नाहीं काय? आम्ही विश्वासाने त्याला पाहूं. तो प्रत्येक आत्म्याला आशीर्वाद देण्यास व ताजेतवाने करण्यास इच्छितो. 116T 361, 362; CChMara 50.5

देवाने असें सांगितलें आहे कीं, जे आजारी आहेत व त्रासांत आहेत त्यांची काळजी घ्यावी. त्यांचे समाधान करणे अगत्याचे आहे आणि त्याद्वारे शब्बाथ मोडला जात नाहीं. पण अनावश्यक कामे करण्याचे टाळावे. ज्या गोष्टी तयारीच्या दिवशी करता आल्या असत्या; लहान सहान गोष्टी पुष्कळ जण निष्काळजीपणाने शब्बाथाच्या आरंभापर्यंत राहूं देतात. असें नसावें, शब्बाथ सुरू होण्याच्या पवित्र वेळेपर्यंत ज्या गोष्टी करायाच्या राहिलेल्या आहेत त्या तशाच शब्बाथ संपेपर्यंत राहूं द्यावे. 122TT 184, 185; CChMara 50.6

शब्बाथ दिवशीं स्वयंपाक करणे सोडून द्यावे. तरीपण थंडे अन्न खाऊं नये. थंडीच्या दिवसांत आदल्या दिवशी तयार केलेले जेवण गरम करावे. आपले जेवण साधे पण रुचकर व चांगले असावे. प्रत्येक दिवशी जे खात नाही असें अन्न तयार करावे. CChMara 51.1

आज्ञापालन करणार्‍यांना जो आशीर्वाद देऊ केलेला आहे, तो मिळविण्याची आपली इच्छा असेल तर आम्हीं शब्बाथ दिवसाचे जास्त कडक रीतीने पालन करावें. मला वाटते आपण पुष्कळदा गरज नसताना या दिवशी प्रवास करतो. शब्बाथ पालनाच्या बाबतींत प्रभूनें जो प्रकाश दिलेला आहे; त्याप्रमाणे बोटीने किंवा मोटारीने या दिवशी प्रवास न करण्याची काळजी घ्यावी. याबाबतींत आम्ही आपली मुलें व तरुण यांना योग्य कित्ता घालून द्यावा. ज्या मंडळ्यांना आमच्या मदतीची गरज आहे तेथें पोहचण्यासाठी व देवाने दिलेला संदेश त्यांना ऐकविण्यासाठी शब्बाथ दिवशी प्रवास करणे जरूर पडेल; पण तिकीट विकत घेणें व इतर व्यवस्था करणे शक्य तो आदल्या दिवशी कराव्यात. आम्ही प्रवासाला निघतो तेव्हां शब्बाथ दिवशी इच्छित स्थळी पोहचणार नाही. याविषयी काळजी घ्यावी. CChMara 51.2

जेव्हां शब्बाथ दिवशीं प्रवास करणे भाग पडते, तेव्हां जगिक गोष्टीकडे आपले लक्ष ओढून घेणार्‍यांची सोबत न करण्याची काळजी घ्यावी. आम्ही आपले मन देवाकडे लावून त्याजवरच केंद्रित करावे. जेव्हां संधि मिळेल तेव्हां सत्याविषयीं इतराशी बोलावे. आम्हीं नेहमी जे त्रासात आहेत त्यांना व गरजू लोकांना मदत करण्यास तयार असावे. अशा बाबत आम्हांला जे ज्ञान व समंजसपणा देवापासून मिळाला तो उपयोगात आणावा अशी देवाची इच्छा आहे; पण आम्ही कामधद्यांविषयी बोलू नये व जगिक संभाषणांत भाग घेऊ नये, सर्व प्रसंगी व सर्व ठिकाण आम्ही देवाशी आपला शब्बाथ पालनाच्या बाबतींत एकनिष्ठपणा दाखवावा अशी त्याची इच्छा आहे. 136T 357-360; CChMara 51.3