Go to full page →

देव जें देनों त्याचा दहावा भाग मागतो CChMara 76

दशांश देण्याची पद्धति मोशाच्या काळापूर्वी जाऊन पोहचते. धार्मिक कार्यासाठी देवाला देणग्या देण्यास मोशाला विशेष पद्धत घालून देण्याअगोदर देवाने आदामाच्या काळांत मागणी केली होती. देवाच्या मागण्या मान्य करून देवाला अर्पण देऊन त्याच्या दयेबद्दल व आशीर्वादाबद्दल उपकारबुद्धि दाखवायची होती. ही पद्धत पिढ्यानपिढ्या चालूं होती व अब्राहामाने ती मलकीसदेकाला दशमांश देऊन पुढे चालूं ठेविली. हाच नियम ईयोबाच्या काळांत चालूं होता. बेथेलमध्ये याकोब असतांना निराधार व वनवासी, असा रात्री झोपी गेला तेव्हां तो एकटाच होता. एक धोंडा उशाला घेऊन निजला असतां त्यानें प्रभूला वचन दिले; “तू जे सर्व मला देशील, त्याचा दशमांश मी तुला देईन.” उत्पत्ती २८:२२. देव मनुष्याला देण्याच्या बाबतींत बळजबरी करीत नाही. सर्व कांही जे तें देतात तें स्वखुशीने दिले पाहिजे. तो आपला खजिना असंतोषाच्या अर्पणाने भरून टाकणार नाहीं. CChMara 76.2

जो भाग देव मागतो त्या बाबतींत देवानें उत्पन्नाचा भाग ठरविला आहे हें मनुष्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर व त्याच्या औदावर सोपविले आहे. ह्या दशाश पद्धतीप्रमाणे मोकळ्या मनाने देण्याचा इरादा आहे त्यांच्यावर ही बाब सोपविली आहे. ज्याअर्थी तें मनुष्याच्या सद्सद्विवेकावर सोपविले आहे त्याअर्थी सर्वांकरिता एक नक्की योजना घालून दिली आहे. त्यात सक्तीची गरज नाहीं. CChMara 76.3

देवानें मोशाच्या काळांत उत्पन्नाचा दहावा भाग देण्यास मनुष्यांना पाचारण केले. या जीविताच्या गोष्टी त्यानें त्यांच्या स्वाधीन केल्या. त्याच्या देणग्या त्यांनी वाढवून त्या त्याला परत करायच्या आहेत. त्यानें कीं, मी तुम्हांला ९ भाग दिले आहेत आणि जो माझा आहे तो दहावा भाग मी मागत आहे. जेव्हां मनुष्य १० वा भाग स्वत:साठी राखून ठेवतो तेंव्हा तो देवाची चोरी करतो. पापार्पणे, शांतापणे व उपकारस्तुतीच अर्पणे हीसुद्धा दहाव्या भागाशिवाय देवाला हवीं होतीं. CChMara 76.4

ज्या उत्पन्नाच्या १० व्या भागाची मागणी देव करतो ती जर राखून ठेवली तर असें करणे स्वर्गीय पुस्तकात चोरी म्हणून लिहून ठेविले जाते. अशाने उत्पन्नकर्त्याला फसविले जाते. हें हेळसांडीचे पाप त्यांच्यापुढे आणल्यावर आपल्या आचरणात बदल करून योग्य नियमाप्रमाणें चालणें एवढेच पुरे नाहीं, याकडून स्वर्गीय नोंदींतील आंकडे जाणार नाहीत. कारण त्यांच्या स्वाधीन केलेली मालमत्ता त्याला परत न करता त्यांनी गिळंकृत केली. देवाबरोबर व्यवहार करण्यांत अविश्वासूपणा दाखविल्याबद्दल पश्चात्ताप व कृतज्ञा दाखविणे योग्य आहे. CChMara 76.5

जेव्हां जेव्हां देवाच्या लोकांनी जगाच्या कोणत्याही काळांत संतोषाने व मनापासून त्याची योजना शेवटास नेली व त्याच्या मागण्या मान्य केल्या व आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने त्याचा मान केला तेव्हां त्यांचे कोठार भरून गेली. पण जेव्हां त्यांनी देवाला दशमांश व अर्पणे या बाबतीत ठकविले तेव्हां त्यांना समजून आलें कीं, तें त्यालाच ठकवीत नाहींत. पण स्वत:ला ठकवितात. कारण ज्या प्रमाणात त्यांनी अर्पणे दिली त्या प्रमाणांत त्यांना आशीर्वाद देण्यांत आला. 1337 393-395; CChMara 77.1

जो मनुष्य दुर्दैवी आहे व कर्जबाजारी आहे तेव्हां त्यानें आपल्या सोबत्याला कर्जासाठी देण्यास प्रभूचा हिस्सा घेऊ नये. त्यानें विचार करावा कीं या बाबतींत त्याची कसोटी होत आहे, आणि प्रभूच्या हिश्यांतून आपल्या उपयोगासांठी राखून ठेवण्याकडून तो देणार्‍यला ठकवितो. त्याच्याजवळ जे सर्व आहे त्याबद्दल तो देवाचा ऋणी आहे. पण जेव्हां तो मनुष्याचे कर्ज फेडण्यासाठी देवाचा पैसा वापरतो तेव्हां दहेरी ऋणी होतो. स्वर्गीय पुस्तकांत देवाशीं अविश्वासू हें शब्द त्याच्या नावापुढे लिहिले जातात. देवाचा तो देणकरी बनतो कारण त्यानें प्रभूचा पैसा स्वत:च्या सोयीसाठी वापरला, आणि देवाच्या पैशाचा उपयोग करण्यांत जो बेकायदेशीरपणा दिसून येईल तो दूसच्या कांही बाबींमध्ये प्रगट होईल. त्याच्या सर्व बाबींमध्ये प्रगट होईल. जो मनुष्य देवाला ठकवितो तो असें शील बनवितो कीं त्याद्वारे तो देवाच्या कुटुंबांत प्रवेश करणारच नाही. 146T 391; CChMara 77.2