Go to full page →

प्रकरण ९ वे - ख्रिस्ताशीं ऐक्य व बंधुप्रेम CChMara 84

देवाचा असा हेतु आहे कीं, त्याच्या लोकांनी ऐक्याने एकत्र व्हावे, एकाच स्वर्गात राहण्याची तें अपेक्षा करीत नाहीत का? ख्रिस्तामध्ये फूट आहे का? देवाच्या दृष्टीने इतकें पवित्र मानलेले कार्य करण्यापूर्वी सर्व प्रकारचा फुटीरपणा व वाईट कल्पना टाकून दिल्याशिवाय तो आपल्या लोकांना विजय देईल काय? ऐक्याने बलप्राप्त होतें, पण फुटीरपणाने दुर्बलता येते. एकमेकांबरोबर राहून मनुष्याच्या तारणासाठी ऐक्याने कार्य केल्यास खरोखर आपण देवाबरोबर सहकारी होऊ.” जे ऐक्याने काम करण्याचे नाकारतात तें मोठ्या प्रमाणात देवाचा अपमान करतात. आत्म्याचा शत्रु एकमेकांबरोबर मांडताना आनंद मानतो. अशानीं बधुप्रेम व अंत:करणातील कळकळ अगी आणावी. जर तें भविष्यकाळाला झाकणारा पडदा बाजूला ओढतील व आपल्या फुटीरपणाचा परिणाम पाहतील तर तें पश्चाताप करायला तयार होतील. 187 240; CChMara 84.1