Go to full page →

संदेष्ट्याला प्रकाश कसा मिळाला CChMara 12

एके वेळी इस्राएल लोकांच्या अनुभवांत आम्ही पाहिल्याप्रमाणे भविष्यवाद्याद्वारे देव त्यांच्याशी कसे दळणवळण ठेवील हें त्यानें आपल्या लोकांस सांगितलें आहे. तो म्हणतो, CChMara 12.2

“तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असल्यास मी त्यास दृष्टांतात प्रगट होतो आणि स्वप्नांत मी त्यांच्याशी भाषण करतो.” गणता १२:२६. CChMara 12.3

शेवटल्या अध्यायात महान् लढ्याचे ... शारीरिक हालचालीसह असलेली दृष्टांताची गोष्ट तुम्ही वाचता. तात्विकरित्या कोणी असें म्हणेल कीं, या प्रकारे दृष्टांत का देण्यांत आलें आहेत ? नि:संशय लोकांचा विश्वास स्थापन करण्यास व प्रभु भविष्यवाद्याशी खन्या रितीने बोलला याची खात्री देण्यास तें देण्यांत आलें आहेत. CChMara 12.4

मिसेस व्हाईट क्वचितच त्या दृष्टांतात असलेली स्थित सविस्तर सांगत. पण एक प्रसंगी त्या म्हणतात, ‘हें संदेश शेवटल्या काळांतील सर्वांचा विश्वास खंबीर करण्यास व संदेशाच्या आत्म्यावर विश्वास ठेवण्यास देण्यांत आलें होतें.” CChMara 12.5

मिसेस व्हाईट यांचे कार्य वाढत असतां त्याची परीक्षा पवित्रशास्त्रावरून होऊ शकते. उदाहरणार्थ, त्यांच्या फळांवरून त्यांस ओळखाल.” पण फळ वाढण्यास वेळ लागतो आणि प्रभूने दृष्टांत देण्याच्या बाबतीत लोकांना विश्वास धरण्यास मदत व्हावी म्हणून पुरावे दिले आहेत. CChMara 12.6

पण सार्वजनिकरित्या दिलेल्या सर्वच दृष्टांतात विशिष्ट शारीरिक हाल चालीचा समावेश नाही. या अध्यायांतील पहिल्या वचनांत देव भविष्यवाद्याला कसा प्रगट होतो हेच सांगितलें नसून तो स्वप्नांतहि त्याच्याशी बोलतो हें सांगितलें आहे. हें भविष्यात्मक स्वप्न आहे व तें दानीएल सांगतो : CChMara 12.7

“बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या पलंगावर पडला असतां त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यांत दृष्टांत घोळू लागले; मग त्यानें तें स्वप्न लिहन काढले व त्याचे सार कथन केले.” दानी. ७:१. CChMara 12.8

दानीएलाला जे प्रगट झाले होतें तें तो सांगत असतांना पुष्कळशा बाबतीत तो म्हणतो, “मी रात्रींच्या दृष्टांतात पाहिलें.” श्रीमती व्हाईट यांच्या अनुभवांत नेहमी त्या रात्रींच्या वेळी विसावा घेत असतां त्यांना दृष्टांत झाले आहेत. अशा तर्‍हेची प्रास्ताविक विधाने आपण वाचतो. “रात्रींच्या दृष्टांतात कांही गोष्टी स्पष्ट रीतीन मला दाखविण्यांत आल्या” किंवा देव वेळोवेळी भविष्यवाद्याला भविष्यात्मक स्वप्नांत बोलला. भविष्यात्मक स्वप्न किंवा रात्रीचा दृष्टांत आणि सर्वसाधारण स्वप्न यांतील संबंधाविषयी प्रश्न उद्भवेल. त्या संबंधाने मिसेस व्हाईट यांनी १८६८ मध्ये लिहिले आहे. CChMara 12.9

“जीवितांतील सर्वसाधारण वस्तूपासून पडणारी पुष्कळ स्वप्ने अशी आहेत कीं, देवाच्या आत्म्याशी त्यांचा कांही संबंध नाही. त्याशिवाय खोटे दृष्टांत व खोटी स्वप्ने सैतानाकडून पडणारी आहेत; पण प्रभूपासून पडलेली स्वप्ने देवाच्या वचनांत दृष्टांतामध्ये समाविष्ट केली जातात. ज्यांना ही स्वप्न पडतात व ज्या परिस्थितीत ही स्वप्ने पडतात यांमध्येच त्यांच्या खरेपणाचा पुरावा आढळतो. CChMara 13.1

एकेकाळी मिसेस व्हाईट यांच्या जीविताच्या शेवटल्या काळांत त्यांचा पुत्र एल्डर डब्ल्यु. सी. व्हाईट यांनी, ज्यांना याविषयी थोडी माहिती होती त्यांना सांगण्यासाठी मदत होण्यास तें माहिती गोळा करीत असतांना त्यांनी विचारलें, “आई रात्रींच्या वेळी तुला प्रगट करण्यांत आलेल्या बाबीविषयी तू नेहमी बोलतेस. ज्या दृष्टांतांत तुला प्रकाश देण्यांत येतो त्याविषयी तू बोलतेस. आम्हा सर्वांना स्वप्ने पडतात पण ज्याविषयी तू नेहमी बोलतेस त्या स्वप्नांत देव तुजशी बोलतो हें तुला कसे माहीत ?” CChMara 13.2

त्यांनी उत्तर दिले कीं, “कारण जो संदेशवाहक दृत दिवसाच्या दृष्टांतात मला माहिती देतो, माझ्या जवळ उभा असतो तोच दूत रात्रींच्या दृष्टांतांत मला माहिती देत माझ्याजवळ उभा राहातो.” ज्या स्वर्गीय व्यक्तीचा उल्लेख केला आहे त्या व्यक्तीला दुसर्‍यर्‍य ठिकाणी ‘दूत’ ‘माझ्या वाटाड्या’, ‘माझा शिक्षक वगैरे म्हटले आहे.’ CChMara 13.3

भविष्यवाद्यांच्या मनांत कांही घोटाळा नव्हता, रात्रींच्या प्रसंगी झालेल्या प्रगटीकरणासंबंधी कांही प्रश्न नव्हता. या परिस्थितीवरून स्पष्ट समजते कीं ही माहिती देवापासून आहे. CChMara 13.4

दुसर्‍य वेळी मिसेस व्हाईट प्रार्थना करीत असतां, बोलत असतां किंवा लिहित असतां त्यांना दृष्टांत झाले होतें. त्यांच्याभोवती असणारांना सार्वजनिकरित्या बोलत असतांना त्या थोडा वेळ थांबल्या म्हणजे त्या दृष्टांतात आहेत असें समजत असत, म्हणून त्यांनी असें लिहिले आहे. CChMara 13.5

“कळकळीच्या प्रार्थनेत गुंतले असतां माझ्या भोवती असलेल्या सर्व गोष्टींचे भान मी विसरले. खोली प्रकाशाने भरून गेली आणि जणू काय जनरल कान्फरन्सच्या सभेत दिला जाणारा संदेश मी ऐकत आहे.” CChMara 13.6

सत्तर वर्षाच्या दीर्घकालीन सेवेत झालेल्या पुष्कळ दृष्टांतात सर्वात लांब दृष्टांत चार तास होता व लहान दृष्टांत कांही क्षण होता. नेहमी तें अर्धा तास किंवा जरा जास्त वेळ असत. पण एकही नियम सांगता येत नाही कीं त्याकडून सर्व दृष्टांतांची माहिती मिळेल. कारण पौलाने लिहिल्याप्रमाणे: CChMara 13.7

“कारण देव अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या ठिकाणी भविष्यवाद्यांद्वारे आपल्या वाडवडिलांशी बोलला आहे.” इब्री. १:१. CChMara 13.8

भविष्यवाद्याला दृष्टांताद्वारे प्रकाश देण्यांत आला होता पण भविष्यवाघाने दृष्टांतात असतां लिहिले नाही. त्याचे कार्य यंत्राप्रमाणे नव्हते. फक्त क्वचित् प्रसंगी प्रभूने त्याला तेच शब्द बोलण्यास दिले नाहीत किंवा दृताने भविष्यवाद्याच्या हाताला तें शब्द लिहिण्यास मार्गदर्शन केले नाही. दृष्टांताद्वारे प्रकाशीत झालेल्या मनांतून भविष्यवाद्याने जमलेल्या जमावासाठी प्रकाश व शिक्षण देण्यास शब्द लिहिले व बोलला. मग तें संदेश वाचत अगर ऐकोत. CChMara 13.9

कदाचित् आम्ही असा प्रश्न विचारू कीं, भविष्यवाद्याचे मन कसे प्रकाशित झाले? त्याला ही माहिती व शिक्षण लोकांना देण्यास कसे प्राप्त झाले? जसा दृष्टांत देण्याच्या बाबतीत एक नियम नाही, त्याप्रकारे भविष्यवाद्याने हा संदेश देण्याच्या बाबतीत एकच नियम नाही. तरीपण प्रत्येक बाबतीत स्पष्ट अनुभव आहे. आणि ज्या प्रकारे जे आम्ही पहातो व ज्याचा अनुभव आपण घेतो, त्याकडून आमच्या मनावर पाहण्यापेक्षा अधिक खोल ठसा उमटतो, त्याचप्रकारे भविष्यवाद्याला दिलेल्या माहितीद्वारे घडणार्‍य गोष्टींची सुलभ साक्ष देत आहेत असें दिसते व त्याकडून त्यांच्या मनावर खोल व टिकावू ठसा उमटला जातो. CChMara 14.1

मागील धड्यांतील महान् लढ्याच्या दृष्टांताची गोष्ट सांगतांना ऐतिहासिक घटनांची माहिती त्यांना कशी मिळाली याविषयीची माहिती आम्ही सांगितली. दुसर्‍य एका प्रसंगी हा प्रकाश त्यांना कसा मिळाला याचे वर्णन करतांना ” या पृथ्वीवर दिसणार्‍य देखाव्याकडे माझे लक्ष वेळोवेळी वेधिले गेले याची माहिती त्यांनी सांगितली. कांही वेळा मला भविष्य काळांत नेवून काय घडणार तें दाखविण्यांत आलें आणि भूतकाळांतल्या गोष्टी घडल्या त्या पुनः मला दाखविण्यांत आल्या .” CChMara 14.2

यावरून स्पष्ट दिसते कीं, एलन व्हाईट यांनी या गोष्टी घडतांना सकृतदर्शनी पाहिल्या. त्या त्यांना दृष्टांतांत पुन: घडवून आणल्या गेल्या व त्यावरून त्यांच्या मनावर स्पष्ट ठसा उमटला गेला. CChMara 14.3

कांही वेळी त्यांना असें समजून आलें कीं, त्यांना जो देखावा दाखविण्यांत आला त्यांत त्या हुबेहुब भाग घेत आहेत. त्यांना भास होत होता, तशा त्या पाहात होत्या व ऐकतही होत्या आणि त्यांचे पालनही करीत होत्या. जरी त्या प्रत्यक्ष नव्हत्या तरी त्यांच्या मनावर तसा परणाम घडवून आणला होता व तो न विसरणारा होता. त्यांचा पान ३५ तें ४० पर्यंत दिलेला पहिला दृष्टांत या प्रकारचा होता. CChMara 14.4

दुसर्‍य प्रसंगी मिसेस व्हाईट या सभेच्या ठिकाणी, घरांत व दूरच्या ठिकाणी असणार्‍य संस्थांत आहेत असें वाटत असें. अशा जमावाच्या प्रसंगी हजर असलेला देखावा इतका स्पष्ट होता कीं, मिसेस व्हाईट या वेगवेगळ्या व्यक्तीनी बोललेल्या शब्दांची व कृतीची इतंभूत माहिती देवू शकल्या. एकदा दृष्टांतांत असतांना मिसेस व्हाईट यांना वाटू लागले कीं त्यांना एका वैद्यकीय संस्थेकडे नेण्यांत येत आहे, त्या खोल्या जशा आहेत तशाच पाहात व जे चालले होतें तें सर्व पाहात होत्या. या अनुभवाविषयी त्या लिहितात: CChMara 14.5

“मूर्खपणाचे भाषण, वेडगळ मस्करी, अर्थहीन हसू त्यांच्या कानाला कटू लागले. मत्सरी लाड मी पाहिला, तेव्हां मला नवल वाटले व मत्सरी शब्द व बेपर्वाईचे भाषण ऐकले, त्याकडून देवाच्या दूतांना लाज वाटली.” CChMara 14.6

नंतर त्याच संस्थेची आर्थिक मनपसंत स्थिति मला प्रगट करण्यांत आली ‘त्यांना कांही खोल्यांत नेण्यांत आलें कीं ज्यामधून प्रार्थनेची वाणी आली. तो किती आदरणीय आवाज होता!” एक माहितीचा संदेश या संस्थेच्या भेटीवर आधारलेला असा लिहिण्यात आला. जो दूत त्यांना वेगवेगळ्या खात्यांतून व खोल्यांतून मार्ग दाखवीत होता. त्याच्या शब्दांवर तो आधारलेला होता. CChMara 14.7

पुष्कळदा मिसेस व्हाईट यांना स्पष्ट अशा लाक्षणिक देखाव्याद्वारे प्रकाश देण्यांत आला. ह्या देखाव्याचे वर्णन पुढील चार वाक्यांत केले आहे. ही वाक्ये एका त्रासांत असलेल्या कामगाराला व्यक्तिवाचक संदेश म्हणून दिलेली होती, त्यांतून घेतली आहेत. CChMara 15.1

“दुसर्‍य एके वेळी तू एका घोड्यावर बसून निशाण फडकावीत चाललेल्या एका सेनापतीसारखा मला दिसला. एकाने येऊन तुझ्या हातातील ‘येशूवरील विश्वास व देवाच्या आज्ञा’ अशी अक्षरे लिहिलेले निशाण काढून घेतले व धुळीत पायाखाली तुडवले. तुझ्याभोवती जमून जगाबरोबर तुझी गणना करतांना कांही मनुष्ये मी पाहिली.” CChMara 15.2

आणखी एके वेळी मिसेस व्हाईट यांना दोन वेगवेगळे देखावे दाखविण्यांत आलें, एक कांही योजना अमलांत आणल्या तर काय घडेल याची माहिती देत होता, व दुसर्‍य देखाव्यांत दुसर्‍य योजनांची कामगिरी दाखविली होती. याचे उत्तम उदाहरण पश्चिम अमेरिकेतील लोमा-लिंडा येथील आरोग्यदायी अन्नाचा कारखाना कुठे असावा यांत दिले आहे. मॅनेजर व त्याचे सहकारी मुख्य दवाखान्याजवळ एक मोठी इमारत उभारण्याची योजना करीत होतें. ही योजना चालूं असतां शेकडो मैल दूर असलेल्या घरांत मिसेस व्हाईट यांना एके रात्री दोन दृष्टांत झाले. एकाविषयी त्या म्हणतात. CChMara 15.3

“मला एक मोठी इमारत दाखविण्यांत आली तिच्यांत वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवीत होतें. बेकरीजवळ दुसर्‍य लहान इमारती होत्या. मी उभी राहिली असतां, जे काम करण्यांत आलें होतें त्याविषयी वाद चाललेला आवाज मी ऐकला. कामगारामध्ये मेळ नव्हता व घोटाळा निर्माण झाला.” CChMara 15.4

नंतर मॅनेजर आपल्या कामगारांत मेळ बसविण्याच्या बाबतीत प्रयत्न करीत असतां निराश झालेला दिसला. त्यांनी हा वाद ऐकणार्‍य आजारी लोकांना पाहिलें. तें म्हणत होतें कीं या सुंदर ठिकाणी खाद्यपदार्थांचा कारखाना दवाखान्याजवळ असणारा स्थापन करावा. नंतर एक देखाव्यांत दिसला व म्हणाला, “हें सर्व तुझ्यासमोर तुला एक धडा शिकण्यासाठी व कांही योजना सिद्धीस गेल्याचा परिणाम दिसावा म्हणून घडवून आणले आहे.” CChMara 15.5

नंतर देखावा बदलला व त्यांना खाद्यपदार्थाचा कारखाना रेल्वे रस्त्यावर दवाखान्याच्या इमारतीपासून दूर असलेला दिसला. अशा प्रकारे देवाच्या योजनेनुसार व लहान प्रमाणांत काम सुरु झाले. दृष्टांताच्या कांही तासानंतर मिसेस व्हाईट लोमालिंडा येथील कामगारांना लिहित होत्या आणि त्यावरून खाद्यपदार्थांचा कारखाना कुठे स्थापन करावा हा प्रश्न मिटला. जर त्यांची प्रथम योजना घडवून आणिली असती तर दवाखान्याजवळच व्यापारी इमारत कांही वर्षांनी झालेली पाहण्यास आपणास लाज वाटली असती. CChMara 15.6

यावरून असें दिसते कीं, वेगवेगळ्या प्रकारे प्रभूच्या सेविकेला रात्रींच्या व दिवसाच्या दृष्टांताद्वारे शिक्षण व माहिती मिळाली. शा प्रकाशित झालेल्या मनांतून भविष्यवादी लोकांना शिक्षण व माहिती देण्यासाठी बोलत असें वे लिहित असें. हें करण्यासाठी मिसेस व्हाईट यांना देवाच्या आत्म्याने साहाय्य केले. पण त्यावर यांत्रिक नियंत्रण नव्हते. सदेश देण्यासाठी त्यांना शब्दांची निवड करण्यास मोकळीक दिली होती. त्यांच्या सेवेच्या आरंभीच्या काळांत मंडळींच्या पत्रकांत त्यांनी असें लिहिले आहे. CChMara 15.7

“जरी मी मला प्राप्त होणार्‍य मताविषयी लिहिण्यास देवाच्या आत्म्याच्या साहाय्यावर अवलंबून होतें, तरी जे कांही मी पाहिलें त्याचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द माझे होतें आणि दुताने बोललेले शब्द मी नेहमी अवतीर्ण चिन्हामध्ये लिहित असें.” CChMara 16.1