Go to full page →

चुका करणान्याला सल्ला CChMara 107

जे स्वत:च्या वैयक्तिक जबाबदारीवर संदेश देण्याचे सुरू करतात व देव त्यांना मार्गदर्शन करतो व शिकवितो असें म्हणतात, तें देवानें जें अनेक वर्षांपासून रचिलें आहे तें पाडून टाकण्याचा प्रयत्न करतात. तें देवाच्या इच्छेप्रमाणे करीत नाहीत हें समजून घ्या कीं, असें करणारी माणसें मोठ्या फसविणार्‍यांच्या बाजूला आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. CChMara 107.4

ज्यांना देवाने पात्रता व पैसा याबाबतीत कारभारी नेमिले आहे तें चुकीच्या तत्त्वांच्या फैलाव होण्यासाठी देवाचा पैसा व्यर्थ खर्ची घालतात; देवाच्या नियमाच्या बंधनकारक हक्काविषयी जे प्रतिपादन करतात त्यांचा द्वेष सर्व जग करीत आहे. यहोवाशी एकनिष्ठ असणारी मंडळी कांही सामान्य झगड्यांत भाग घेत नाहीं. “आमचे युद्ध रक्तमांसाबरोबर नसून सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपति, आकाशांतला दुरात्मा समूह ह्याबरोबर आहे.” इफिस ६:१२ हें युद्ध काय आहे याचा ज्यांना थोडी कल्पना आहे तें मंडळीच्या लढवय्याविरुद्ध आपले हत्यार चालविणार नाहींत. पण सर्व शक्ति खर्च करून देवाच्या लोकांसह सैतानाच्या कटाला तोंड देतील. 102TT 356, 357. CChMara 107.5

*****