Go to full page →

अनाथांची काळजी घेणें. CChMara 129

आमच्या साहाय्याची ज्यांना गरज आहे अशामध्ये विधवा व पोरकी यांना आमच्या कळकळीच्या सहानुभूतीची गरज आहे तें प्रभूच्या विशेष काळजीतले आहेत. तें देवाकरता ख्रिस्ती लोकांना उसने दिलेले आहेत. “देवपिता यांच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्याच्या दृष्टीने समाचार घेणें व स्वत:ला जगाच्या कलंकापासून राखणे हें आहे.” याकोब १:२७. CChMara 129.1

पुष्कळ पुरुष विश्वासानें देवाच्या सार्वकालिक वचनावर अवलंबून राहून गेलेले आहेत व आपले प्रियजन प्रभूच्या स्वाधीन करून तो काळजी घेईल या भावनेने तें मरून गेले आहेत. प्रभु या अनाथांना कसे पुरवितो? तो स्वर्गातून मान्ना पाडून त्यांच्यासाठी चमत्कार करीत नाहीं. तो त्यांना अन्न पुरविण्यासाठी कावळ्याना पाठवीत नाही. पण तो मनुष्याच्या अंत:करणांवर चमत्कार करतो, त्यांच्या आत्म्यापासून स्वार्थ काढून टाकून औदार्याचा झरा मोकळा करतो. पौडलले व पोरके अशांना देव आपल्या अनुयायांच्या स्वाधीन करून त्यांच्या प्रेमाची कसोटी घेतो. CChMara 129.2

ज्यांच्यामध्ये देवाची प्रीति आहे त्यांनी या अनाथ लेकराकरता आपली घरें व अंत:करणे उघडी करावीत. मोठ्या संस्थेमध्ये अनाथांची काळजी घेण्याची योजना चांगली नाहीं. जर त्यांना त्याची काळजी घेण्यासाठी त्यांचे नातलग नसतील तर मडळीच्या सभासदानी त्याना दत्तक म्हणून आपल्या कुटुंबांत घ्यावे किंवा दुसर्‍य कुटुंबांत त्यांच्यासाठी सोईचे घर पाहावें. CChMara 129.3

हीं मुलें विशेष प्रकारे ख्रिस्ताच्या काळजीतली असून त्याची काळजी घेण्यात निष्काळजीपणा करणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय. ख्रिस्ताच्या नावाने प्रत्येक दयेचे कलेले कृत्य त्याला स्वत:ला केल्याप्रमाणे तो स्वीकारितो. 116T 281. CChMara 129.4

*****