Go to full page →

देवाची आपल्या लोकांविषयींची वैयक्तिक आवड CChMara 137

देव आणि येशू ख्रिस्त यांचा संबंध पवित्रशास्त्रावरून स्पष्ट कळून येतो आणि त्यावरून त्यांचे व्यक्तित्व स्पष्ट दिसून येतें. CChMara 137.5

देव हा ख्रिस्ताचा पिता आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. ख्रिस्ताला उच्चस्थान देण्यांत आलें आहे. तो पित्यासमान आहे. पित्याचा सर्व सल्ला पुत्रासमोर उघड आहे. CChMara 137.6

हें ऐक्य योहानाच्या १७ व्या अध्यायांत सांगितलें आहे. त्यात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली आहे. CChMara 137.7

“मी त्याच्यासाठीं केवळ नाहीं, तर त्यांच्या वचनावरून जे मजवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठींहि विनंति करतो. यासाठी, त्या सर्वांनी एक व्हावे. हें पित्या, जसा तू मजमध्ये वे मी तुजमध्ये तसे त्यांनीही आम्हामध्ये व्हावे, यासाठीं कीं, तू मला पाठविले असा विश्वास जगानें धरावा. तू जे गौरव मला दिले आहे तें मी त्यांस दिले आहे. यासाठीं कीं, जसें आपण एक आहों तसे त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्याजमध्ये व तूं मजमध्ये, यासाठी कीं त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावें कीं, तू मला पाठविले आणि जशी तू मजवर प्रीति केली तशी त्याजवरही प्रीति केली.” (योहान १७:२०-२३.) CChMara 137.8

अद्भूत विधान ! ख्रिस्त व त्याचे शिष्य यामधील ऐक्याकडून कोणाच्याही व्यक्तिमत्वाचा नाश होत नाहीं. तें हेतु, मन, शील याबाबर्तीत एक असून व्यक्तीने वेगवेगळे आहेत. त्याचप्रमाणे देव व ख्रिस्त एक आहेत. CChMara 138.1

आमच्या देवाच्या हकुमांत स्वर्ग व पृथ्वी आहे. आम्हांला कशाची गरज आहे हें त्याला माहीत आहे. आम्हांला फार जवळचे दिसते; परंतु त्याच्या दृष्टीला अदृश्य असें कांही नाहीं, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे वागडे आहे.” (इब्री ४:१३.) तो पृथ्वीच्या मध्यभागीं सिंहासनारूढ झाला आहे; त्याच्या दृष्टीला सर्व गोष्टी उघड्या आहेत. त्याच्या महान व सौम्य चिरकालपणापासून त्याच्या दृष्टीला जे योग्य दिसते तें तो हुकूम देऊन पुरवितो. CChMara 138.2

त्याच्या दृष्टीपासून एक चिमणीदेखील आड होत नाहीं. देवाविरुद्ध सैतानाचा जो द्वेष आहे त्याकडून मुक्या जनावरांचादेखील नाश करण्यास त्याला आनंद वाटतो. देवाच्या दयेच्या काळजीने आकाशांतील पक्षी त्यांच्या आनंदाच्या गाण्याने आम्हांला आनंद देण्यास राखिले जातात. पण तो एक चिमणीलाही विसरत नाहीं. “भिऊ नका. बहुत चिमण्यांहून तुमचे मोले अधिक आहे.” (मत्तय १०:३१.) 28T 263-273 CChMara 138.3

*****