Go to full page →

ईश्वरी संरक्षण ChSMar 203

जरी हा संघर्ष अखंड आहे तरी त्यामध्ये एकट्यालाच झगडायची गरज नाही. देवाबरोबर नम्रतेने जीवन जगणाऱ्यांना देवदूत मदत करुन त्यांचे रक्षण करतात. त्याच्यावर निष्ठा दर्शविणाऱ्याला परमेश्वर कधीच धोका देणार नाही. अधर्मापासून संरक्षण मिळण्यासाठी त्याचे लोक त्याच्याजवळ जातात तेव्हा तो दया व प्रेम यांच्यामुळे शत्रु विरुद्ध त्यांच्यासाठी आदर्श, प्रमाण उंचवितो. तो म्हणतो, ते माझ्या मालकीचे आहेत. त्यांना स्पर्श करु नको. माझ्या तळहातावर त्यांना मी कोरुन ठेविले आहे. - प्रोफेटस् अॅण्ड किंग्ज ५७१. ChSMar 203.2

धार्मिकते करिता ज्यांचा छळ होतो त्यांना स्वर्ग फार जवळ आहे. त्यांच्या श्रध्दावंत लोकांशी त्यांच्या आस्थेशी तो आपला समन्वय साधून घेतो. त्याच्या संत लोकांचा छळ होतो तेव्हा त्याचा छळ होतो. त्याच्या निवडलेल्यांना जे स्पर्श करतात ते त्याला स्पर्श करतात. शारीरिक उपद्रव किंवा विपत्ति यांच्यापासून बचाव करण्यास जी शक्ति नजीक आहे तीच शक्ति मोठ्या दुष्टाईपासून वाचविण्यास जवळ आहे. त्याच्याद्वारे सर्व परिस्थितीत देवाच्या सेवकाला आपला प्रामाणिकपणा चोख ठेवण्यास शक्य होईल आणि दिव्य कृपेने विजय संपादन करता येईल. - प्रोफेटस् अॅण्ड किंग्ज ५४५. ChSMar 203.3

मंडळीवर आलेले अरिष्ट धोका आणि शत्रुने तिला केलेली इजा यांचा परमेश्वराला कधी कधी विसर पडला आहे असे भासेल, परंतु परमेश्वर मंडळीला विसरला नाही. या जगामध्ये देवाला मंडळी इतके काहीही प्रिय नाही. ऐहिक धोरणामुळे ती भ्रष्ट होईल. अशी त्याची इच्छा नाही. सैतानाच्या मोहाला बळी पडावे म्हणून तो आपल्या लोकांना सोडीत नाही. जे त्यांचा विपर्यास करतील त्यांना तो शिक्षा देईल, पण मनापासून पश्चाताप दग्ध होणाऱ्यास दयापूर्ण राहील. ChSMar 203.4