Go to full page →

हेतु ChSMar 228

सर्वांनी एकत्र येण्याचा हेतु काय आहे? देवाला कळविण्यासाठी की त्याला सांगण्यासाठी की तू आम्हा सर्वांना प्रार्थनेमध्ये ठाऊक आहेस? आम्ही एकत्र येतो, एकमेकांना बोध करतो आणि आमचे अंतर्विचार आणि भावना बदलण्यासाठी, सामर्थ्य एक करण्यासाठी, प्रकाश व धैर्य मिळविण्यासाठी एकमेकांची ओळख करून घेणे उच्च आशा आणि उत्सुकता व कळकळीची प्रार्थना करण्यासाठी, अंतःकरणापासून व हृदयापासून प्रार्थना करणे. विश्वासाने प्रार्थना करण्यासाठी आणि असे एकत्रित आल्यामुळे आपल्याला एक ताजेपणा येतो एक जोम येतो आणि त्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ChSMar 228.4

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च २:५७८. ChSMar 228.5

आपल्या या कॅम्प सभेला एकत्र येण्याचा आणखी एक हेतु आहे. ते म्हणजे आपल्या लोकांमधील आध्यात्मिक जीवनाची उन्नती करणे. देवाने आपल्या हाती अतिपवित्र कार्य दिले आहे. आणि हे कार्य करण्याची योजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. म्हणजे ते कार्य करण्यासाठी आपली योग्य तयारी होईल. म्हणजे आपण वैयक्तिकपणे लोकांशी देवाविषयी व सत्याविषयी कसे बोलावे याची माहिती मिळेल व त्यावर चर्चा करण्याची संधी मिळेल. देवाचे पवित्र नियम सोसायट्यातील लोकांना सांगण्याचे धाडस आपणास होईल. “देवाचा कोकरा’ या नात्याने आपण त्याचे गौरव करून व त्याला उचलून धरू ज्याने जगाचे पाप घेऊन गेला. योहान १:२९. आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. कारण पवित्र स्पर्शाची आवश्यकता आहे. ज्यायोगे आपणास आपले कार्य समजेल. ChSMar 228.6

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:३२,३३. ChSMar 229.1

याप्रकारे योग्य सभा घेतल्यास ही एक प्रकारची शाळाच आहे जेथे पालक, वडील, सेवक हे सर्व आपल्या धन्याच्या सेवेसाठी योग्य कार्य करण्यासाठी तयार होतील. या विद्यालयामध्ये मंडळीचे सर्व सभासद योग्य कार्य करण्यास शिकतील. वृद्ध तरूण आणि सर्व थरातील सभासदांना या ठिकाणी सुवार्ता कार्याचे शिक्षण घेतल्यास त्यांना त्याचा फायदाच होईल परंतु ते इतरांनाही हे शिक्षण देऊ शकतात व त्याचा अनेकांना उपयोग होईल. ChSMar 229.2

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४९. ChSMar 229.3

गेल्या काही वर्षामध्ये अशाप्रकारच्या सभांमधून आपल्या सभासदांच्या सभेमध्ये असे अनेक तरूण शिकून तयार झाले व त्यांनी तीन देवदूतांचा संदेश पसरविला आणि इतर सभासदही या संधीचे त्यांनी सोने करून मोठी प्रगती केली व तीन देवदूतांच्या संदेशाचे सत्या लोकांना कळविले. या संधीचा फायदा घेऊन प्रथम त्यांना आपले कुटुंब सोसायटी आणि इतरांना त्यांनी शिक्षण दिले. अनेकजण त्यांच्या गावाहून वार्षिक सभेसाठी एकत्र झाले असतील आणि वर्षभरात त्यांनी जे उत्तम कार्य केले त्याचा अहवाल ते देऊ शकतील. मंडळीच्या सभासदांना त्यांनी काय काय यश मिळविले याचे विश्लेषण करतील. ज्या ठिकाणी त्यांनी अशाप्रकारच्या कॅम्पसभा भरविल्या. त्यामध्ये त्यांना अनेक आत्मे मिळाल्याचे यश त्यांना आले असतील. वार्षिक सभा अशासाठी भरविण्यात येतील की वर्षभरामध्ये कोणाकोणाला किती यश आले याचा अहवाल प्रत्येकाने द्यायचा आहे. त्यांचे वैयक्तिक कार्य आणि पद्धत इतरजण घेऊ शकतील व अपयशाच्या त्रुटी काढून टाकतील. ChSMar 229.4

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:८१. ChSMar 229.5

काही सभांमध्ये आपले अधिकारी ओळख करून देण्याचे नाकबूल करतील. ते आपली स्वतःची पद्धत सांगणार नाहीत. काहीजण शिकविण्याऐवजी भाषणे देऊनच लोकांची मने वळवू शकतात. परंतु वार्षिक संमेलनामध्ये एकत्र येण्याची संधी कोणी गमावू नये कारण यामध्ये मिशनरी कार्य कसे करावे त्याचे विभिन्न प्रकार आपणास ऐकायला मिळतील. मग तुम्ही कोठेही असा. ChSMar 229.6

- टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:८२. ChSMar 230.1