Go to full page →

कामगाराच्या हातांना सामर्थ्य देणे ChSMar 235

देवाच्या लोकांनी त्याचे सत्यवचन पूर्ण अमेरिकेमध्ये पूर्ण केल्याचे पाहण्यास देवाला आनंद होईल. भूतकाळामध्ये तर कार्य झालेच आहे परंतु या शेवटच्या काळातील कार्य महत्वाचे आहे. आपण ओल्सन यांचे हात बळकट करूया. उत्तर अमेरिकेमध्ये परदेशी विभागाचे ओ.ए.ओल्सन हे जनरल सेक्रेटरी होते. त्यांच्या या थोड्याच कार्यकर्त्यांवर व धडपडीवर आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही. कारण हे कार्य महान आहे याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याचे महत्व कोणाला समजणार नाही. ChSMar 235.6

- द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २९ ऑक्टोबर १९१४. ChSMar 235.7

एल्डर ओल्सन यांनी आम्हाला हेही सांगितले होते की आम्ही इटालियन, सैबरियन, रूमनियमन, रशियन आणि इतर राष्ट्रे या सर्वांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल त्यांच्याबरोबर आम्ही आनंद व्यक्त केला. परंतु तरीही वाईट वाटत होते की आम्ही जास्त कार्य करू शकतो नाही. कारण आमच्याकडे मनुष्यबळ कमी पडले होते. आमची आशा आहे की आम्ही जे गोळा करू शकलो अमेरिकेतील मंडळ्यातील सभासदांना एक प्रोत्साहन मिळेल आणि तेही नव्या उमेदीने कार्यासाठी बाहेर पडतील. मोठ्या शहरांमध्ये जाऊन तेथे कार्य करण्यासाठी विभागाच्या अधिकार्यांची परवानगी अनेकजण घेतील. अशाप्रकारे त्यांना अनेक कार्यकर्ते मिळतील आणि मोठ्या प्रमाणात देवाचे कार्य होईल अशी त्यांना आशा वाटते. अशाप्रकारे इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा कार्य सुरु होईल. ChSMar 235.8

- रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड २९ ऑक्टोबर १९१४. ChSMar 236.1