Go to full page →

साधेपणा ChSMar 269

जेव्हा ख्रिस्त आपल्या अनुयायांना म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनो पुढे व्हा आणि मंडळी स्थापन करा.’ या साध्या वाक्यातून त्याने साधेपणाच्या गरजेची महती दर्शविली. कमी ......, कमी दिखावा, तेवडा त्यांचा चांगल्या कार्याचा प्रभाव जास्त ! ख्रिस्त जसे बोलला तसेच त्याच्या अनुयायांनी साधेपणाने बोलायला हवे. - द अॅक्टस ऑफ आपोस्टलस २८. ChSMar 269.6

साधे व नम्र बोलणे हे हजारो लोकांशी जवळीक साधू शकते. उच्च बुद्धिमान स्त्री व पुरुष जे जगामध्ये ईश्वरीय देणगी म्हणून, प्रतिभा संपन्न म्हणून गणले जातात. ते एखाद्याच्या, जो परमेश्वरावर प्रीति करतो आणि तो अगदी नैसर्गिक प्रकारे त्या प्रेमाबद्दल बोलू शकतो जसा एखादा मानव त्याला सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टीबद्दल अगदी सहज बोलतो, अशांच्या एक साध्या साध्या शब्दानेही ताजातवाना होतो. अनेकदा खुप अभ्यासलेले व चांगल्या प्रकारे मोजून मापून तयार केलेले बोलणे / भाषण एवढा प्रभाव पाडू शकत नाही. जेवढा प्रभाव देवाच्या मुलाने वा मुलीने नैसर्गिक साधेपणाने, प्रामाणिक व खरेपणाने व्यक्त केलेल्या शब्दाने होतो, कारण बऱ्याच काळापासून ‘ख्रिस्त व त्याची प्रिती’ यासाठी बर असलेले त्याच्या हृदयाचे दार उघडण्याची त्याच्यात शक्ति असते. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स २३२. ChSMar 270.1