Go to full page →

कौशल्य ChSMar 274

योग्य क्रमवारी, इत्यंभुतपणा व रवानगी किंवा पाठवणी या तीन महत्त्वाच्या गोष्टीची सवय लावून घेणे प्रत्येक ख्रिस्ती माणसाचे कर्तव्य आहे. कोणत्याही प्रकारचे काम ढेपाळल्या प्रमाणे करण्यात काही प्रयोजन नाही. कोणी सतत कामच करत रहातो, पण ते काय उरकतच नाही. याच कारण हे की तो आपले काम आपले मन व हृदय अपूर्ण करत नाही. वरवरचे काम करतो. जो हळूहळू काम करतो तो खरंतर नूकसानीत काम करतो. त्याने स्वतः आपली ही चूक पारखावी व दूरुस्त करावी. अशांनी ठरविलेल्या वेळेतच आपले काम कसे पार पाडले जाईल अशी नेमक्या योजनेचा सराव करण्यास शिकावे, जेणेकरुन त्यांचा निकाल चांगला लागेल. योग्य रणनिती व योग्य पद्धत वापरुन काही लोक पाच तासात जेवढ काम करतील तेवढच काम करण्यास एखाद्याला दहा तास लागतील, काहीजण जे घरकामात व्यग्र असतात आणि सतत कामच करत असतात याचा अर्थ असा नाही की त्यांना खूप काम करावयाचे असते, तर त्याच्यापाशी वेळ वाचविण्यासाठी काही ठराविक याजनाच नसते ते कामच करत राहतात. त्यांच्या ह्या सावकाश व रेंगाळणाऱ्या कार्य पद्धतीमुळे थोड ही काम ते मोठ्ठ करुन ठेवतात. जर त्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल केला व योजनापूर्वक काम केले तर ते सहज त्यावर मात करतील. त्यांनी एक ठराविक लक्ष ठेवावे, एखाद्या कामाचा निपटारा होण्यास केवढा अवधी लागेल याचा कालक्रम ठरवावा व त्यानंतर आपले सर्व प्रयत्न त्यासाठी खर्ची घालावे जेणेकरुन योजलेल्या ठराविक कालावधितच ते काम पूर्ण होईल. मानसीक शक्तिचा वापरण्याचा सराव आपोआप तूमच्या हाताला गती देईल. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन्स - ३४४. ChSMar 274.1

ख्रिस्ताच्या कार्यासाठी तत्पर आज्ञाधारकता हवी. - द सदर्न वॉचमन - ऑगस्ट ९, १९०४. ChSMar 275.1

परमेश्वर मागणी करतो की त्यचे त्याच्या कामकऱ्याकडे असे दिन्य चैतन्य, मन असावे जे आत्म्याचे मोल जाणण्यास तत्पर, कर्तव्य पार पाडण्याकामी तत्पर व परमेश्वराने दिलेल्या जबाबदारीस प्रतिसाद देण्यास तत्पर असेल. - TFTC - ९:१२३. ChSMar 275.2

परमेश्वराने दिलेली जबाबदारी पार पाडण्यास लागणारे श्रम हा धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. ‘परमेश्वराची कृती’ या नात्याने त्याचे कार्य करण्याचा आलेल्या संधी माणसाने गमवू नये. योग्य वेळी तत्पर व निर्णायक क्रिया तेजस्वी विजय प्राप्त करेल आणि कार्यातील ढिलायी व दूर्लक्ष हा परमेश्वराचा अवमान असेल. - प्रोफेटस् अॅन्ड किंग्ज ९७६. ChSMar 275.3