Go to full page →

अध्याय २५ : पवित्र आत्मा ChSMar 288

वचनबद्धता ChSMar 288

आज आपणास पवित्र आत्म्याचे दान मिळण्यास तो वचनबद्ध आहे, जसा सर्वप्रथम अनुयायास मिळाला होता. आजही स्वर्गातून स्त्री व पुरुषावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल (परमेश्वर करेन) तसा पन्नासाव्या दिवशी (पेटेकॉस्ट डे) झाला होता. या क्षणाला जे त्याच्या वाणीवर विश्वास ठेवतात त्यांना पवित्र आत्मा व त्याची कृपा सर्वांना मिळेल. TFTC - ८:२०. ChSMar 288.1

पवित्र आत्म्याचे दान, वय, जात यापर्यंत मर्यादित नाही. ख्रिस्ताने जगाच्या शेवटापर्यंत आपल्या अनुयायांसाठी पवित्र आत्म्याची दैवी अनुभूति सिद्ध केली आहे. मंडळीमध्ये ही पवित्र आत्म्याची वानवा नसावी. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहनानंतर जे प्रार्थनेत वाट पहात आहेत आणि परमेश्वराचे सामर्थ्य प्रत्येक हृदयात वसेल असा विश्वास असणारे शिष्य यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे. भविष्यात पृथ्वी त्याच्या दैवी प्रकाशाचे तेजोमय होईल. जे त्याच्या सत्याने पवित्र झालेले आहेत त्यांचा वारसा जग पुढे चालेल. हे सत्य कृपेने मंडित असे असेल. पवित्र आत्मा मनुष्याच्या हृदयात कार्य करेल. परमेश्वराच्या गोष्टी मनुष्यास दाखवेल. ChSMar 288.2

हे सत्य आहे की हा शेवटचा काळ आहे. आता परमेशराचा पृथ्वीवरील कार्यकाल संपत आला आहे. पवित्र आत्म्याच्याप्रेरणेने त्याच्या पवित्र विश्वासू सेवकाकडून केलेल्या कार्याचा मोबदला म्हणून आपणास दैवी कृपा लाभणार आहे. तो सुरवातीच्या व शेवटच्या वर्षावातून जो पेरणीच्या वेळी व कापणीच्या वेळी होतो त्याप्रमाणे होईल. प्रारंभीच्या ख्रिस्ता शिष्यांकरिता तो सुरवातीचा वर्षाव होता आणि त्यांचा वैभवशाली परिणाम होता आणि या शेवटच्या समय मंडळीशी संलग्न असणे हीच पवित्र आत्म्याची देणगी असा गणले जाईल. - द अॅक्टस अॅन्ड आपोस्टल्स ५४:५५. ChSMar 288.3

जगाच्या सुरवातीस संदेष्ट्यावर झालेला पवित्र आत्म्याचा वर्षाव हा सुरवातीचा पाऊस आहे व त्याचे परिणामही वैभवशाली आहेत, परंतु नंतरची पर्जन्यवृष्टि ही पुरेपूर असेल. आता सध्या रहात असणाऱ्याकरिता ही किती मोठी पर्वणी आहे ? “अहो अशा धारकही आपल्या पवित्र ..... वळा. कारण आजही मी तुम्हास दुप्पटीने देण्याचे वचन देतो.’ या काळात परमेश्वराच्या पर्जनदृष्टीची मागणी करा. जेणेकरुन तो प्रकाशमय आभाळातून प्रत्येकावर त्याचा पर्जन्यदृष्टी करेन. TFTC - ८:२१. ChSMar 288.4

पालक आपल्या पाल्यांना चांगली बक्षीस देतात त्याही पेक्षा जास्त पवित्र आत्म्याचे दान, त्याची सेवा करणाऱ्यास द्यावे यासाठी परमेश्वर उत्सूक आहे. - द अॅक्टस् ऑफ द आपोस्टल्स ३०. ChSMar 289.1

सर्वकाळी व सर्व जागी, सर्व दुःखात, सर्व यातनेत जेव्हा गोंधळाची स्थिती असते आणि भविष्य अंधकारमय वाटते आणि एकाकी व हतबल झाल्यासारखे वाटते त्यावेळी विश्वासाने केलेल्या प्रार्थनेचे प्रत्युत्तर म्हणून ‘सांत्वन’ करणाऱ्याची नियुक्ति केली जाईल. कदाचित अशी परिस्थिती येईल की आपण आपल्या जगीक मीत्रापासून वंचित होवू. परंतु कोणतीही परिस्थिती, कोणताही दूरावा आपल्याला आपल्या सांत्वन कर्त्यापासून विलग करु शकणार नाही. जिथे कुठे आपण असू व जेथे कुठे जाणार असू तो आपल्याला उजव्या हाताशी आधार, सहनशक्ति ....... आणि उत्साह बनून थांबलेला आहे. - द डिझायर ऑफ एजेस ६६९, ६७०. ChSMar 289.2

रोज पहाटे, जेव्हा येशूच्या शिकवणीची घोषणा करणारे त्याचे अनुयायी प्रभूपुढे गुडघे टेकून त्याच्या कार्यास वाहून घेण्याच्या व्रताचे नूतनीकरण करत असतात त्यावेळी पूनरुज्जीवन व पवित्रतेच्या सामर्थ्यासह प्रभू त्यांना पवित्र आत्म्याची उपस्थिती प्रदान करतो. दिवसाची सुरुवात करतानाच पवित्र आत्म्याचा अदृष्य प्रतिनिधी त्यांना खात्री देत असेल की ते परमेश्वरा सोबतचे कामकरी असतील. - द अॅक्टस ऑफ द अपोस्टल्स ५६. ChSMar 289.3

आपण पवित्र आत्म्याच्या दैवी सामर्थ्यामध्ये जगत आहोत. जो मानवतेचा प्रतिनिधी म्हणून प्रकाशित होण्याकरिता पहात आहे. यामुळेच पवित्र आत्म्याचा या जगावरील प्रभाव वाढणार आहे. - द सदर्न वॉचमन, नोव्हेंबर ३, १९०३. ChSMar 289.4