Go to full page →

अध्याय ४: जगाच्या अवस्थेशी ख्रिस्ती तोंड देत आहेत ChSMar 71

जगाचे नाटक ChSMar 71

जग ही एक रंगभूमी आहे. तेथे कलाकार आपले काम करतात. या शेवटच्या अंकामध्ये ते आपापली भूमिका पार पाडीत आहेत. या जगात मानवामध्ये ऐक्य नाही. प्रत्येक जण आपापला स्वार्थ पूर्ण करु पाहात आहे. या सर्व गोष्टी देव पाहात आहे. त्याचा अधिकार न जुमानणाऱ्यांकडे तो पाहात आहे. देवाचा जो हेतू आहे तो पूर्ण तो करीलच देवाने हे जग मानवाच्या हाती दिले नाही जरी देवाने त्यांच्यामध्ये गोंधळला परवानगी दिली. तरीही देवाचे कामगार जगाच्या नाटकाच्या शेवटच्या अंकामध्ये आपले कार्य करीत आहेत. नाटकाच्या या शेवटच्या प्रवेशामध्ये सैतान मीच ख्रिस्त आहे या वेशात येईल आणि अनेकांना फसविल. जे धार्मिक नाहीत ते सहज फसले जातील. या सर्व लोकांचे एकच मत असेल मे एक विचाराचे असतील. त्यांची गुप्त संघटना असेल. ते आपल्या शत्रु विरुद्ध कारस्थान करण्यासाठी खलबत करतील. त्याचे परिणाम नंतर होण्यासाठी ते योजना करतात. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. २७, २८. ChSMar 71.1