Go to full page →

अध्याय ५: मंडळीही प्रशिक्षण विभाग ChSMar 81

काळाची गरज ChSMar 81

मंडळीच्या उन्नतिसाठी ज्या गोष्टींची गरज आहे आणि ती म्हणजे चांगल्या व गुणवंत लोकांची कला ओळखणे. ही कला धन्यासाठी व मंडळीच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांसाठी या कलेचा उपयोग मंडळीला होईल. अशा या गुणवंत सभासदांना इतर मंडळ्यामध्ये पाठवून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी करण्यासाठी तशा प्रकारची योजना करावी. मंडळीची भरभराट करण्यासाठी मंडळ्यामधून सर्व सभासदांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे अति आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या मोठ्या आणि छोट्या मंडळ्यामध्ये सुवार्ता प्रसाराचे प्रशिक्षण देणे अति आवश्यक आहे. जे अविश्वासू आहेत त्यांनाही विश्वासात कसे आणावे याचेही शिक्षण घेणे गरजेचे आहे. ते नियमितपणे चर्चला जातात त्या तरुण तरुणींना सुवार्ता प्रसाराचे कार्य करुन आत्मे जिंकण्याचे कार्य यशस्वी कसे होईल याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११७. ChSMar 81.1

देवाची अपेक्षा आहे की मंडळीने सुव्यवस्थितपणा आणि सभ्यतेने वागावे आणि जगामध्ये ही तसेच सुव्यवस्थित वागावे व आपल्याजवळ असणारे शिक्षण इतरांना द्यावे म्हणजे त्यांच्याही स्वभावामध्ये योग्य सजावट होईल. जी देवाला आवडेल व तुमच्या कलेला महत्त्व येईल. या कलेचा वापर इतरांवर होऊन इतरांमध्ये सुधारणा होईल. त्यांना सत्य समजेल व त्यांचे स्वभाव स्वच्छ व शुध्द होतील. याचा फायदा शिकणाऱ्यांना आणि शिकविणाऱ्यांनाही होईल आणि धन्याच्या सर्व तत्त्वांचा वापर योग्य प्रकारे केला जाईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:७०. ChSMar 81.2

थोडाही विलंब न लावता प्रथम मंडळीच्या सभासदांना शिक्षण दिले पाहिजे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:११९ ChSMar 81.3

आमच्या लोकांना सहाय्य करण्याचे एक महान कार्य हे त्यांना शिक्षण देणे हे आहे. म्हणजे ते देवाचे कार्य करु शकतील म्हणजे ते पाळकांवर अवलंबून न राहता स्वत:च देवाचे कार्य करतील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ७:१९. ChSMar 81.4

हा पुरावा असा आहे की इतकी सर्व भाषणे करुन सुद्धा मंडळीमध्ये सुधारणा मुळीच झाली नाही. मंडळीमध्ये मोठ्या संख्येने काहीच प्रगती घडून आली नाही. या विषयी लोकामध्ये स्वनकार करण्याचे एकही उदाहरण दिसून येत नाही किंवा लोकांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही. आणि ही गंभीर बाब आहे. आपले भविष्य हे एक सार्वकालिक पैज आहे. असे वाटते की मंडळ्या सुकून जात आहेत. कारण ते आपली दाने किंवा कला वापरण्यामध्ये विसरले आहेत. धन्याने दिलेल्या प्रकाशाचा वापर प्रत्येकाने विश्वासाने जगासमोर सांगितलाच पाहिजे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४३१. ChSMar 82.1

शिक्षण आणि सराव या दोन्ही गोष्टींमुळे देवाचा कामगार त्याच्या कार्यात तरबेज बनतो. मग एखादे तातडीचे काम जरी असले तरी त्याने तयार असले पाहिजे. यासाठी योजना असणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्याची योजना असावी. ती वर्तुळाकार असावी. असे केल्यास प्रत्येकाला आपापली जबाबदारी कळेल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ९:२८१. ChSMar 82.2