Go to full page →

कार्य करताना शिकणे ChSMar 88

विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांना देवाचे कार्य करण्यासाठी वेळ दिला जातो. हीच वेळ आहे की आपल्या सभोवार असणाऱ्या समाजातील लोकांना प्रत्येक कुटूंबामध्ये आध्यात्मिक जीवनाची ओळख करुन देणे हे गरजेचे आहे. त्यांनी या जगामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये इतके गुंतून जाऊ नये की त्यांना आध्यात्मिक जीवनासाठी वेळ मिळू नये. इतका त्यांच्यावर बोजा देऊ नये. मिशनरी बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणजे चुकलेल्यांना ते योग्य मार्गदर्शन करतील आणि त्यांना सत्य मार्गावर आणतील. मानवतेसाठी कार्य करुन ख्रिस्ताकडून ज्ञान आणि दृष्टांत मिळविण्याचा प्रयत्न करतात. ते प्रार्थना करतात व जागृत राहून सत्याचा शोध घेतात आणि जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४५, ५४६. ChSMar 88.5

जेथे शक्य असेल तेथे विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्षामध्ये सुद्धा मिशन कार्यामध्ये स्वत:ला गंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी आपले मिशन कार्य शहरामध्ये व खेड्यामध्येही करावे. त्यांनी आपल्या स्वत:च्या टोळ्या आणि वेळा करुन योजनेनुसार कार्य करावे. विद्यार्थ्यांनी देवाची कृपा संपादन करण्यासाठी त्यांनी काळ पाहू नये ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळेल त्या त्या वेळी त्यांना आपले मिशन कार्य करावे. जेव्हा आपले शिक्षण संपल्यावर त्यांनी कार्याला सुरुवात केली तर त्यांना काहीच अडचण येणार नाही. कारण शिक्षण काळामध्येच त्यांना मिशन कार्याचे प्रशिक्षण घेतलेले असते. कार्याचा त्यांना अनुभव आला होता. त्यांनी आपला वधस्तंभ घेऊन नि:स्वार्थीपणे इतरांची सेवा त्यांच्या शिक्षण काळात केली होती. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४७. ChSMar 89.1

तरुणांची मने केवळ शिक्षणाच्या धड्यांनी भरणे एवढेच पुरेसे नाही तर त्यांनी साध्य केल्यावर त्यांना त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अँण्ड स्टूडंटस. ५४५. ChSMar 89.2

आमची कॉलेजस आणि प्रशिक्षण क्षेत्रामधून मिशनरी वेगवेगळ्या भागांमध्ये पाठविले जातात. शाळांमधून प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना मिशनरी कार्याचा अनुभव घेऊ दे. त्यांना ही संधी देण्यात येते. येथे ते अनुभव घेतात आणि त्यांची चाचणी होते यावरुन दिसून येईल की ते लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्यामध्ये किती पात्र आहेत. आणि योग्य गोष्टी ज्या स्वर्गात आहेत त्या किती प्रमाणात धरुन राहतात. - कॉन्सल्स टू पेरेंटस, टिचर्स अॅण्ड स्टूडंटस. ५४९. ChSMar 89.3