Go to full page →

घातकी चूक ChSMar 93

जिवात्मे जिंकण्याचे काम फक्त पाळक वर्गाचेच आहे अशी कल्पना करणे ही प्राणघातक विचारसरणी आहे. उच्च अधिकार पदावर जे आहेत त्यांनी विनम्र समर्पित निष्ठावंताला उत्तेजन दिले पाहिजे. ज्याच्यावर द्राक्ष मळ्याच्या मालकाने जिवात्म्याच्या तारणाचे ओझे ठेवले आहे. देवाच्या मंडळीतील पुढाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे की त्याच्या नावावर श्रध्दा ठेवल्याल्या प्रत्येकासाठी उद्धारकाचा आदेश आहे. डोक्यावर हात ठेऊन दीक्षा दिलेल्या पाळकाखेरीज देव अनेकांना त्याच्या द्राक्ष मळ्यात काम करण्यास पाठविल. - द अॅक्टस ऑफ अपोस्टल. ११०. ChSMar 93.5

सर्वांची कल्पना अशी आहे की पाळकानेच सर्व ओझे उचलायचे आहे. ही फार मोठी चूक आहे. अति कामाने आणि निराशा यामुळे तो लवकरच कबरेमध्ये जाईल, परंतु त्याने आपले ओझे मंडळीतील सभासदांना वाटून दिले तर पाळक जास्त आनंदी आणि जिवंत राहील. हे ओणे कदाचित विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडथळे होतील म्हणून मंडळीतील सभासद इतरांना शिक्षणही देऊ शकतील आणि ख्रिस्ताचे अनुकरण करण्यासाठी शिकवितील. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ६:४३५. ChSMar 94.1

अधिकाऱ्यांनी स्वत:ला वाटून देऊ नये की सर्व कामाची जबाबदारी त्यांचीच आहे. बोलणे, प्रार्थना करणे ही सर्व कामे त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सांगून त्यांच्याकडून करुन घ्यावीत. प्रत्येक मंडळीमध्ये असेच करणे आवश्यक आहे. मंडळीच्या सर्व सभासदांना काहींना काही देणग्या असतातच. बायबल वाचणे, प्रार्थना करायला सांगणे आणि वचनातून शिकविणे अशी कार्य सभासदांनी करुन पाळकांना सहकार्य करु शकतात. असे करुनच त्यांना कार्यकारी शिक्षण प्राप्त होते. - गॉस्पल वर्कर्स १९७. ChSMar 94.2

मंडळीचे जे कार्य आहे ते पाळकांनी करु नये. त्यांनी त्यांचेच कार्य करावे. मंडळीतील कोणी जर पाळकाचेच काम करु लागले तर त्यांना अटकाव करावा. उलट पाळकांनी सभासदांना समाजामध्ये आणि मंडळीमध्ये कसे कार्य करावे याचे शिक्षण द्यावे. - हिस्टॉरिटकल स्केचेस २९१. ChSMar 94.3

अविश्वासणाऱ्यांमध्ये जेव्हा पाळकांनी सभा भरविली तर इतर सभासदांनी त्यांना सहकार्य करावे पाळकांच्या मागे उभे राहून त्यांना प्रत्येक गोष्टींचे सहकार्य करावे. - गॉस्पल वर्कर्स १९६. ChSMar 94.4