Go to full page →

उत्तम उदाहरण ChSMar 96

त्याच्या कष्टाच्या वेळी ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला होता. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या संवर्धनासाठी ते बहुअंशी जबाबदार आहे. असे प्रेषितांना वाटत होते. खऱ्या देवाच्या आणि ज्याला त्याने पाठविले त्या येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात त्यांची वृद्धि व्हावी ही त्याची मनिषा होती. कार्य करीत असताना बहुधा तो स्त्री पुरुषांच्या लहान लहान गटांना भेटी देत असे आणि त्यांच्या समवेत मान लपववून प्रार्थना करीत असे व देवाशी घनिष्ठ व जिवंत संबंध राखण्यासाठी तो देवाजवळ आग्रहपूर्वक विनंती करीत असे. इतरांना सत्य प्रकाश देण्यासाठी कोणती कार्यशील पद्धत अमंलात आणावी ह्या विषयी तो त्यांच्याबरोबर वारंवार विचार विनीमय करीत असे. ज्यांच्यासाठी त्याने कार्य केले. त्यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांना वाईटापासून राखण्यास आणि निष्ठावंत, कार्यक्षम मिशनरी राहण्यास सहाय्य करण्यास देवाजवळ तो आर्जव करीत असे. - द अॅक्टस ऑफ द अपोस्टल. २६२. ChSMar 96.2