Go to full page →

पुढे चालण्याचा हुकूम ChSMar 102

वेलिंग्टन येथील ड्युक एकदा ख्रिस्ती मंडळीच्या सभेला हजर होते. विधर्मी लोकांमध्ये त्यांचे मिशनरी कार्याला यश कसे मिळेल यावर ते चर्चा करीत होते. त्यांनी ड्युकला विनंती केली की त्यांनीही यावर काही प्रकाश टाकावा की थोड्या खर्चामध्ये या कार्यामध्ये प्रमाणबद्ध यश कसे येईल. ड्युक हा वृद्ध एक सैन्यातील शिपाई होता. तो म्हणाला, “सभ्य गृहस्थ हो, तुम्ही कोणाच्या हुकूमावरुन पुढे चालता ? तुमच्या चर्चमध्ये यश येणे हा प्रश्न नाही. तुम्हाला जसा हुकूम मिळतो त्याप्रमाणे तुम्ही पळता, “तुम्ही सर्व जगात जाऊन राज्याची ही सुवार्ता गाजवा. सभ्य गृहस्थ हो तुम्ही कूच करण्याच्या हुकूमावरुन चाला.’ — गॉस्पल वर्कर्स, ११५. ChSMar 102.3