Go to full page →

जोरदार स्पष्टीकरण ChSMar 119

ईश्वरी प्रीति ही मानवासाठी अगाध, अपरंपार आहे आणि देवदूत आश्चर्याने त्यांची वागणूक पाहतात. देवाच्या प्रीतिला मानवाचा उथळ प्रतिसाद पाहून देवदूतांना दुःख होते. मानवाच्या या देवाच्या दुर्लक्ष केल्याने पूर्ण स्वर्ग मानवावर नाराज झाला आहे. मानवाच्या आत्म्याने परमेश्वराच्या प्रीतिकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला ठाऊक असेल की ख्रिस्त याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो ? एखादे मूल थंडी आणि बर्फामध्ये हरविले तर त्याच्या आईला आणि बापाला काय वाटेल ? त्यामुळेच काय झाले असेल आणि आई बापांना काय शिक्षा मिळत असेल ? ते मूल जगले वाचले असेल तर त्याची काय अवस्था होत असेल ? त्यांच्या डोळ्यातील अरु आपल्या मुलावरील प्रेम व्यक्त करीत नाहीत काय ? खून करणाऱ्यांना ते दोष देत नाही काय ? प्रत्येक मनुष्य जो त्रासात असतो ते देवाचे मूल असते. द डिजायर ऑफ एजस ८२५. ChSMar 119.3

मी एका मनुष्याची गोष्ट ऐकली, तो बर्फाल प्रदेशातून प्रवास करीत होता. ते हिवाळ्याचे दिवस होते. यामुळे त्याचे सामर्थ्य हळूहळू नष्ट होत चालले होते. त्यामुळे अति थंड वातावरणामुळे आणि दीर्घ बर्फाली प्रदेशामुळे तो मृत्युच्या दारात चालला होता. जीवन मरणाच्या या लढाईमधून त्याने माघार घेण्याचे ठरविले, परंतु त्याची नम्रता त्याला वाचवायला आली. त्याने त्याच्याभोवती असणारा बर्फ बाजूला करायला सुरुवात केली. कसा तरी सर्व बर्फ तोडून तो उभा राहू शकला. त्याने निकराचे प्रयत्न करुन तो उभा राहू शकला, परंतु तो चालू शकत नव्हता. त्याच्या मित्रांनी त्याला कसेबसे घरी पोहोचविले. त्यानेही आशा सोडली नाही, त्याचे रक्त त्याच्या नसांमधून थिजले होते. त्याने स्वबळवर आपले शरीर उबदार करुन त्याचा रक्तप्रवाह सुरळीत केला. त्याने स्वत:ला आणि आपल्या शेजाऱ्यांचाही जिव वाचविला. जिव वाचविण्याचे हे खडतर कष्ट आजच्या तरुणांना एक धडा या तरुणांना देणे अति गरजेचे आहे. म्हणजे त्यांच्या ख्रिस्ती अनुभवामध्ये एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्या या विश्वासाचा नमूना त्यांना ओळखावा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च. ४:३१९,३२०. ChSMar 120.1

तुम्ही स्वत:ला स्वत:साठी बंद करु शकत नाही. आणि जी सत्य ज्ञानाची सामग्री तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही आशीर्वादीत आहात. हे सत्य तुमच्यापर्यंत कोणी आणले ? तुम्हाला देवाच्या वचनाचा प्रकाश कोणी दिला ? देवाने तुम्हाला त्याचा प्रकाश दिला तो झुडूपामध्ये लपवून ठेवण्यासाठी नाही. सर जॉन कॅन्कलिन यांनी लिहिलेला मोहिम नावाचा लेख मी वाचला होता. हुशार माणसांनी आपली घरे सोडली आणि उत्तर समुद्राकडे फिरायला गेली. खाजगीपणाचा त्रास, भूक, थंडी आणि विचलितपणा आणि हे सर्व कशासाठी ? बहुतेक मृत शरीरे शोधून काढायची आणि त्यामुळे सन्मान मिळविणे हा मुख्य उद्देश किंवा शक्य असेल तर जे लोक किंवा पर्यटक मृत्यंच्या दारात असतील ज्यांना मदतीशिवाय पर्याय नसतो नाहीतर त्यांचा मृत्यु अटळ असतो अशांची सुटका करण्याच्या कार्यासाठी हा सर्व आटापीटा हे लोक करतात आणि त्यांनी जर काहींचा जीव वाचविला तर त्यासाठी त्यांना घेतलेल्या त्रासाचा मोबदला त्यांना दिला जातो. ChSMar 120.2

या विषयी विचार करा आणि कबूल करा की आपण व आपले समर्पण किती छोटे आहे. एखाद्याचा प्राण वाचवायचा असेल तर आपल्याभोवती जे त्रासात असतील त्यांना सहाय्य करण्यासाठी आपण घरातून बाहेर पडत नाही. आपल्या भोवती असे अनेक आत्मे आहेत ज्यांचा नाश होत आहे. स्त्री आणि पुरुष आशाविणा मरत आहेत. देवाशिवाय मरत आहेत आणि तरीही आम्हांला त्यांची मुळीच काळजी वाटत नाही. “मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय ?” अशीच आपली प्रवृत्ति झाली आहे. ज्या लोकांनी दुसऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चे बलिदान देऊन प्रशंसा मिळविली. इतरांच्या सार्वकालिक जीवनासाठी आपण काय करावे जे आमच्या समोर आत्मे आहेत त्या विषयी आपल्याला काय वाटते. आपण जर देवाने दिलेले कार्य केले नाही मानवाच्या आत्म्याच्या तारणासाठी काही केले नाही तर काय होईल ? देवाची हीच गरज आहे. - रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड. १४ ऑगस्ट १८८८. ChSMar 121.1

न्यू इंग्लंडमधील एका खेड्यामध्ये विहीर खणण्याचे काम चालू होते. जेव्हा काम जवळ जवळ संपत आले तेव्हा एक मनुष्य अजून खालीच होता. तेवढ्यात विहीरीचा काही भाग कोसळला आणि त्या मनुष्याला काढून टाकले. त्याचबरोबर धोक्याची घंटी वाजली आणि इंजिनीयर, मॅकेनिक, शेतकरी व वकील हे सर्व गोळा झाले आणि ढिगाऱ्याखाली त्या श्वास बंद असलेल्या मनुष्याची सुटका केली. दोऱ्या, शिड्या व कुदळ या सर्व गोष्टी आणल्या गेल्या आणि त्याला वाचवा, त्याला वाचवा असे आवाज येऊ लागले. अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी आपली शक्ति एकवटून कपाळावर घात येईपर्यंत काम केले. तो जिवंत असेल अशी आशा ठेऊन आपल्या हाकेला ओ देईल म्हणून त्याला हाका मारु लागले. तो जिवंत असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. परंतु आता घाई केल पाहिजे. अगदी ती भितीदायक व गंभीर वेळ होती आणि सर्वांनी आनंदाने आरोळी मारली. तो मनुष्य जिवंत होता. त्यांचे कष्ट वाया गेल नाहीत. तो जिवंत असल्याचा आनंद स्वर्गापर्यंत पोहोचला. प्रत्येक गल्लीतून दुमदुमला, “तो वाचला आहे.’ ChSMar 121.2

एका मनुष्याला वाचविण्यासाठी इतका मोठा आवेश आणि उत्साह योग्य आहे काय ? नक्कीच नाही, परंतु ऐहिक जीवन आणि आत्मा यांची तुलना कशी करता येईल ? जगीक जीवन हे तात्पुरतेच असते, परंतु आत्मा सार्वकालिक संपला तर फार मोठे नुकसार होते. आत्म्याचा नाश झाला तर तो सार्वकालिक असतो याची जाणीव होऊन मनुष्य फार घाबरतो. म्हणून ख्रिस्तापासून वेगळे झाल्यास माणसाचा आत्मा धोक्यात येतो ? एका मनुष्यासाठी अनेक लोक एकत्र येऊन विहीरीमध्ये गाढले गेलेल्याला जीवदान दिले तशा प्रकारे देवाच्या सर्व लोकांनी ख्रिस्तासाठी आत्मे वाचविण्याचे कार्य करुनये काय ? - गॉस्पल वर्कर्स ३१,३२. ChSMar 122.1