Go to full page →

ख्रिस्ती जीवन हे सृष्टीचा सुंदर देखावा ChSMar 135

ज्यांच्या अंत:करणात देवाच्या वचनाचा स्वीकार झाला आहे ते बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याच्या डबक्या सारखे नाही आणि पाणी गळून जाणाऱ्या फुटक्या हौदासारखे नाही ते डोंगरातील पाण्याच्या प्रवाहासारखे आहे. तेथे झऱ्यातून सतत थंडगार स्फटीकाप्रमाणे स्वच्छ पाणी खडकातून खळखळ वाहात येऊन थकल्या भागलेल्यांना तृषीतांना, ओझ्याने त्रासलेल्या तृषीतांना ताजेतवाने करिते. सतत प्रवाह वाहत असलेल्या नदीसारखे ते आहे. जशी ती पुढे वाहत जाते तसे तिचा प्रवाह खोल आणि विस्तीर्ण होतो आणि शेवटी जीवन देणारे तिचे पाणी सर्व पृथ्वीवर विस्तारीले जाते. जो प्रवाह पुढे खळखट वाहात जातो. तो आपल्या हिरवळीचा ताजेपणा आणि फलदायीला मागे राखतो. किनाऱ्यावरील गवत हिरवेगार, टवटवीत असते वृक्षांची छटा आगळी चकचकीत असते आणि फुलांचे ताटवे विपुल दिसतात. उन्हाळ्यातील कडक उन्हात पृथ्वी जेव्हा कोरडी आणि शुष्क तांबूस रंगाची बनते तेव्हा नदीच्या पात्राचा हिरवेगारपणा उठून दिसतो. ChSMar 135.2

हीच गोष्ट देवाच्या खऱ्या मुलांची आहे. ख्रिस्ताचा धर्म जीवन शक्तिचे, चैतन्याचे व्यापक तत्त्व आणि जागृत, उत्साही कार्यशील आध्यात्मिक सामर्थ्य म्हणून प्रगट होते. जेव्हा स्वर्गीय सत्याच्या प्रभावासाठी अंत:करण उघडे करण्यात येते तेव्हा ही तत्त्वे पुन्हा अरण्यातील प्रवाहाप्रमाणे वाहात राहतील. आणि जेथे ओसाड, दुष्काळ दिसतो तेथे फलद्रुपता दिसून येते. - प्रॉफेटस अॅण्ड किंग्स २३३, २३४. ChSMar 135.3