Go to full page →

एकत्रित ख्रिस्ती सैन्य ChSMar 21

विश्वातील बंधू आणि भगिनींनो तुमच्या हृदयात प्रश्न निर्माण होतो का? की मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय ? तुम्ही ख्रिस्ती असल्याचा दावा करता तर तुम्ही तुमच्या भावाचा राखणदार आहात. आत्म्यांचे तारण होण्याकरिता देव मंडळीला जबाबदार धरतो. - हिस्टॉरिकल स्केच २९१. ChSMar 21.3

उद्धारकर्त्याने आपल्या जीवनामध्ये एक अशा मंडळीची स्थापना केली की तिने जे दुःखी, त्रासलेले आणि परीक्षेमध्ये पडलेल्या लोकांची सेवा करण्यास योग्य व्हावे. विश्वासणाऱ्यांचा गट निर्धन, अशिक्षित व अपरिचीत असेल, परंतु ते ख्रिस्तामध्ये राहून ते घराघरातून समाजामध्ये जाऊन एवढेच नाही तर दूरच्या क्षेत्रामध्ये जाऊन असे कार्य करु शकतात. की ज्याचा परिणाम अनंकालिन पोहोचू शकतो. द मिनिस्ट्री ऑफ हिलींग १०६ आध्यात्मिक अंधकाराच्या युगात देवाची मंडळी डोंगरावर उभारलेल्या नगरीप्रमाणे होती. युगानुयुग आणि पिढ्यान पिढ्या स्वर्गाची शुद्ध शिकवण तिच्या कक्षेत उघड करुन सांगण्यात येत आहे. कदाचित ती दुर्बल व सदोष ChSMar 21.4

अशी दिसेल, परंतु विशिष्ट अर्थाने परमेश्वर मंडळीविषयी आपल्या मनात सर्वश्रेष्ठ आदर बाळगितो. त्याच्या कृपादानाची ती रंगभूमि आहे आणि तेथे अंत:करणाचे परिवर्तन करण्याच्या त्याच्या सामर्थ्याचे प्रगटीकरण करण्यात त्याला सुखानंद वाटतो. - ॲक्टस ऑफ अपोस्टल १२. ChSMar 22.1

कोणीतरी ख्रिस्ताच्या कार्याची पुर्तता करावी. त्याने जगामध्ये सुरु केलेले कार्य कोणीतरी पुढे चालू ठेवावे आणि मंडळीला ती संधी दिली आहे या हेतूने त्याची स्थापना केली आहे. मग मंडळी ही जबाबदारी का स्विकारीत नाही ? टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९५. ChSMar 22.2

तो मंडळीला नेमून दिलेल्या कार्याची जबाबदारी उचलण्यासाठी पाचारण करतो. प्रत्येक मंडळीने आपापल्या प्रांतामध्ये सत्याची सुधारणा आणि प्रसारणाची जबाबदारी सांभाळण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी नव्या जागेत जाण्याचे पाचारण करतो. टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:२९२. ChSMar 22.3

थेस्सलतिका येथील भक्तगण खरे मिशनरी होते... प्रदर्शित केलेल्या सत्याद्वारे अंत:करणे जिंकण्यात आली आणि जिवात्म्याचा भक्तगणारा समावेश करण्यात आला. अॅक्टस ऑफ अपोस्टल २५६. ChSMar 22.4

बारा जणांचा दीक्षा समारंभ झाला तेव्हा मंडळीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी पहिले पाऊल उचलले गेले ख्रिस्ताचे गमन झाल्यानंतर ह्या पृथ्वीवर त्यांनी याचे काम पुढे चालवायचे होते. अॅक्टस ऑफ अपोस्टल १८. ChSMar 22.5

देवाची मंडळी पवित जीवनाचा राजदरबार आहे. तेथे पवित्र आत्म्याने बहाल केलेल्या नानाविध देणग्याचा संग्रह आहे. ज्यांना ते सहाय्य करतात व आशीर्वाद देतात. त्यांच्या सुख समाधानामध्ये आपले सुख समाधानामध्ये आपले सुख समाधान सभासदांनी मानले पाहिजे. ज्याच्या मंडळीद्वारे यशस्वीपणे तडीस नेण्याच्या कार्याची मूळ रचना प्रभु परमेश्वर करितो आणि ते कार्य विस्मयजनक असून त्याद्वारे त्याच्या नावाचे गौरव होऊ शकते - द अॅक्टस ऑफ अपोस्टल १२,१३ आपले कार्य स्पष्टपणे देवाच्या वचनावर अवलंबून आहे. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती लोकांमध्ये एक झाले पाहिजे. मंडळी ते मंडळी ही मानवतेची एक संस्था ते एक मानवतेचे साधन झाले. पवित्र सहकारी प्रत्येक एजन्सी पवित्र आत्म्याला दुय्यम आहे आणि हे सर्व एकत्रितपणे जगाला देवाच्या कृपेची चांगली बातमी देतात व जनरल कॉन्फरन्स डेली बुलेटिन २८ फेब्रुवारी १८९३, पान ४२१. आपल्या मंडळ्या एकमेकींशी सहकार्य करुन आध्यात्मिक जीवनावर कार्य करुन आत्म्याची कापणी करण्याची तयारी करतात. जमीन कठिण असते म्हणून ती खणून मऊ करावी लागते. आणि मग त्यामध्ये बी पेरावेत. धार्मिकतेचे बी पेरल्यानंतर त्यांना वरचेवर पाणी द्यावे लागते. आत्मे जिंकायचे असतील तर शिकवणीमध्ये व खतपाणी घालण्यामध्ये खंड पडू देऊ नये. शिक्षक हे देवाचे असतात. त्यांच्या शिक्षणात संशय नसतो. शिक्षकांना धार्मिकतेचे बी पेरण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे थांबवू नये. कार्य त्रासाचे जरी असले तरी त्यांनी लोकांमध्ये पवित्र वचने पेरण्याचे कार्य नेटाने करावे. त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल आणि पिक जोमदार येईल. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ६:४२०. ChSMar 22.6

मंडळी मनुष्याच्या उद्धाराकरिता परमेश्वराने नेमलेले साधन माध्यम आहे तिची रचना सेवेसाठी करण्यात आली होती आणि संपूर्ण जगाला सुवार्तेची घोषणा करणे हे तिचे जीवन कार्य होते. त्याची परिपूर्णता व पुरतेपणा जगापुढे त्याच्या मंडळीद्वारे परावर्तित व्हावा अशी परमेश्वराची योजना आरंभापासून होती. अंधकारातून अद्भुत प्रकाशात येण्यास पाचारण केलेल्या सभासदांनी त्याचे गौव प्रदर्शित करावयाचे होते. द अॅक्टस ऑफ अपोस्टल कोणत्याही मंडळीने विचार करु नये की ही सेवा अति नगण्य आहे, परंतु हे कार्य अति यावेळी अति महान आहे. अति महत्त्वाचे आहे. हे परिवर्तन करण्याचे एकट्याचे कार्य नाही. म्हणून बंधुंनो तुम्ही कार्याला लागा. हे कार्य देवाच्या पसंतीचे आहे. मोठी सभाही या कार्यासाठी अति फायद्याचे आहे. नि:स्वार्थीपणा आणि नम्रतेचे कार्य हे त्याच्या प्रीतिची मुकूट तुमच्या डोक्यावर मोठा आशीर्वाद असेल. ते एक मोठे पारितोषिक असेल. तुम्ही हे कार्य तुमच्या ऐपतिप्रमाणे करा आणि तो तुम्हाला सामर्थ्य पुरविल. रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड मार्च १३, १८८८. ChSMar 23.1