Go to full page →

दोघा दोघांना पाठवा ChSMar 160

बारा शिष्यांना स्वत: जवळ बोलावून घेऊन, येशूने दोघांची जोडी करुन त्यांना खेडोपाडी व गावोगावी जाण्यास सांगितले. कवेळ एकट्याला कोणालाही पाठविले नव्हते तथापि भावासंगती भाऊ, मित्रांबरोबर मित्र अशा जोड्या केल्या होत्या. त्यामुळे ते एकमेकाला मदत करु शकत होते. एकमेकाला सल्ला देऊ शकत होते. प्रोत्साहन देऊ शकत होते. एकमेकांबरोबर प्रार्थना करु शकत होते. कठीण प्रसंगी प्रत्येकजण एकमेकाला आधार होऊ शकत होते आणि त्यानंतरही येशूने अशाच पद्धतीने इतरांना पाठविले. अशा पद्धतीने पाठविण्याचा तारणाऱ्याचा मुख्य हेतू असा होता की सुवार्ता सांगणाऱ्या सुवार्तीकाचा परस्परां बरोबर असाच संबंध जोडला जावा. आपल्या आजच्या काळात या पद्धतीचा लक्षपूर्वक अवलंब केला गेला असता तर आपण सुवार्तेच्या कार्यात कितीतरी पटीने यशस्वी झालो असतो. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ३५०. ChSMar 160.3