Go to full page →

सुवार्ता प्रसारासाठी निमंत्रण देणे ChSMar 162

अनेक गोष्टी आशा आहेत की त्या गोष्टींवर आपण कार्य करु शकतो. परंतु काम करण्याची सवय असणे आवश्यक आहे व तशी गोडीही हवी. अनेकजण असे आहेत की त्यांना चर्चला नाण्यची आवड नाही. पाळक काय सांगतात ते त्यांना आवडत नाही. सत्य त्यांना आवडत नाही. त्यांच्याकडे वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्यांना देवाचे सत्य सांगून त्यांची मने वळविणे आवश्यक आहे. देवाच्या घराकडे त्यांचे पाय वळविण्यासाठी खटपट करणे आवश्यक आहे. देवाविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. सुरुवातीला ते त्यांना आवडणार नाही, परंतु या गोष्टी सतत करीत राहिल्यास त्यांचे मने वळतील सध्याचे सत्य त्यांना सांगणे अति आवश्यक आहे. तुमच्या प्रार्थना व विनवण्याचा प्रथम नाकार करतील. परंतु तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही आपला निर्णय सोडू नका त्याला घट्ट चिकटून राहा. यश मिळेपर्यंत खटपट करा. तुमच्या कष्टाचा मुगूट तुम्हाला मिळेल. - द रीव्हिव्ह अॅण्ड हेरॉल्ड १० जून १८८०. ChSMar 162.4