Go to full page →

पवित्र उदाहरण ChSMar 167

ख्रिस्त हा आपला महान वैद्यकिय मिशनरी असे आपले उदाहरण आहे. त्याने आजाऱ्यांना बरे केले आणि सुवार्ता सांगितली. त्याच्या सेवेमध्ये आजार बरे करणे आणि सुवार्ता सांगणे या दोन्हींची सांगड होती. ही दोन कार्ये वेगळी नव्हती. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१७०, १७१. ChSMar 167.1

ख्रिस्ताच्या सेवकांनी ख्रिस्ताचे अनुकरण करावे. येशू जसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे व त्याने पीडितांचे समाधान केले आणि आजाऱ्यांना बरे केले. यानंतर येशूने त्याच्या साम्राजाचे महान सत्य त्यांना सांगितले. येशूच्या सेवकांनी हेच व असेच काम करावे. त्यांच्या शारीरिक गरजा पुरवून सुटका कराल त्याद्वारे त्यांच्या आत्म्याच्या गरजा समजून तुम्ही त्यांची सेवा कशी करावी हे मार्ग समजतील. - ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन २३३, २३४. ChSMar 167.2

जे कोणी ख्रिस्ताची मुले आहेत असा दावा करतात त्यांना ख्रिस्ताचे उदाहरण म्हणून त्याचे अनुकरण करावे. शारीरिक गरजा तुमच्या मित्रांना पुरवा आणि त्यांची कृतज्ञता सर्व अडथळे दूर करील. आणि तुम्ही त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचाल. हे प्रकरण विश्वासाने मान्य करा. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ९:१२७. ChSMar 167.3

विशेष करुन जे खरेच वैद्यकिय मिशनरी आहेत ते आत्म्यामध्ये प्रेमळ असावे लागते. त्यांच्या तोंडचे शब्द आणि स्वभाव ख्रिस्तासारखा असावा. त्यांचे वैद्यकिय कार्य हे पवित्र असावे. - टेस्टिमोनिज फॉर द चर्च ७:१२७. ChSMar 167.4