Go to full page →

श्वसन : MHMar 207

शुद्ध रक्त मिळण्यासाठी आपण दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे. शुद्ध हवेमध्ये दीर्घ श्वसन आवश्य घ्यावा. यामुळे फुफ्फुसामध्ये शुद्ध हवा (ऑक्सिजन) भरणे अति आवश्यक आहे. यामुळे रक्त शुद्ध होते. ऑक्सिजनमुळे रक्त शुद्ध व चमकदार होऊन शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पोहोंचविले जाते. योग्य श्वसन नाडीची गती शांत करते. भूक वाढते आणि पचन शक्ति व्यवस्थित होते. तसे झोप चांगली लागते. MHMar 207.4

फुफ्फुसांना शक्य होईतो स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. स्वतंत्रपणे कार्य केल्यामुळे फुफ्फुसे उत्तम प्रकारे कार्य करु शकतात. त्यावर दबाव आणणे किंवा बंधन लादण्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. बसून किंवा वाकून काम केल्यामुळे या समस्या निर्माण होतात. जास्त वेळ बसून काम केल्यामुळे याचे धोके निर्माण होतात यामुळे दीर्घ श्वास घेता येत नाही. लवकरच जलद आणि उघळश्वास घेण्याची संवय लागते आणि यामुळे फुफ्फुसाचे प्रसरण होण्यास मर्यादा येते. आवळ कपडे वापरल्यामुळे शसुद्ध अशी समस्या निर्माण होते. पोटाच्या स्नायुपेशी सुद्धा श्वसनासाठी सहाय्यक होतात आणि जर पोटावर पॅन्ट आवळून बांधल्यास श्वसनास अडथळे निर्माण होतो म्हणून कपडे ढिले वापरावेत. नाहीतर फुफ्फुसे आपले कम व्यवस्थित करु शकत नाहीत. MHMar 208.1

अशा प्रकारे फुफ्फुसांना कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह हळू होतो. फुफ्फुसातील व्यर्थ आणि विषारी घटक बाहेर पडू शकत नाहीत आणि यामुळे रक्त अशुद्ध बनते. केवळ फुफ्फुसेच नाहीत परंतु इतर इंद्रियांवर सुद्धा विपरीत प्रभाव पडतो. जसे पोट पचनस्था, मूत्रपिंडे आणि मेंदू सुद्धा त्वचा पिवळी पडते, पचन संस्था थंड पडते. हृदयावर दाब पडतो आणि मेंदूवर अंधार पडतो. विचार भ्रमिष्ट होतात. शरीराचे समस्त तंत्र सुस्त होते. यामुळे शरीराचे व मानसिक आरोग्य बिघडते. MHMar 208.2

फुफ्फुसे नेहमी शरीरातील कचरा बाहेर टाकतात म्हणून त्यांना नेहमीच शुद्ध हवेची गरज असते. दूषित हवा नेहमीच योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकत नाही. आणि रक्ताला जीवन शक्ति न मिळताच ते मेंदू व इतर इंद्रियांकडे पोहोंचविले जाते. अशा प्रकारे आम्ही आपल्या पूर्ण घरामध्ये शुद्ध हवेची अपेक्षा करतो परंतु बंद घरामध्ये व बंदिस्त ठिकाणी ताजी हवा मिळू शकत नाही तर तेथील हवा दूषित बनते. विशेषतः अशा ठिकाणी राहिल्यास मनुष्य आजारी पडू शकतो. बऱ्याच महिला घरामध्ये राहिल्याने पिवळ्या पडतात. त्या दुबळ्या होतात. घरातील बंद आणि दूषित वातावरणामध्ये राहिल्याने त्यांच्या फुफ्फुसामध्ये दूषित हवा साचून राहते आणि हा दूषितपणा पुन्हा रक्तामध्ये मिसळला जातो. MHMar 208.3