Go to full page →

तंबाखूची सवय MHMar 251

तंबाखू एक हळूहळू परिणाम करणारे एक अत्यंत घातकी विष आहे. तंबाखूचे विष कोणत्याही स्वरुपात घेतले तर ते अति घातकच असते. ते आपला विषारी प्रभावी पाडल्याशिवाय राहात नाही. ते अति घातक असल्याचे कारण म्हणजे त्याचा प्रभाव हळूहळू व नकळत होत असतो. सुरुवातीला याचे परिणाम दिसून येत नाहीत. प्रथम शरीराचे स्नायु उत्तेजित होतात आणि मग नंतर शरीर लुळे पडते. तंबाखुचे व्यसन हे मादक पदार्थांपेक्षाही अधिक धोकादायक असते. हे खुप घातक आहे. कारण शरीरावरील याचा प्रभाव कमी करणे अति कठीण होते. तंबाखूमुळे मद्यपान करण्याची सवय सुद्धा लागते. धूम्रपानाच्या माध्यमाने तंबाखूच्या वापराने फुफ्फुसे निकामी होतात. कॅन्सर होण्याचे धोके वाढतात. MHMar 251.4

तंबाखू सेवन महाग तर असतेच इतरांनासुद्धा सवय लागू शकते. धूम्रपान करणारांमुळे इतरांनाही जे त्याच्या संपर्कात येतात त्यांनाही तितकाच धोका असतो जितका धूम्रपान करणारांना असतो. धूम्रपान करणारा धूम्रपान न करणाऱ्याच्या तोंडावर धूर सोडून निघून जातो. गर्दी गर्दीच्या ठिकाणीसुद्धा जे धूम्रपान करतात त्यांच्यापासून सावध राहावे. यामध्ये कोणा सिगारेटचे धूम्रपान करतात तर कोणी विडी ओढतात. ते हवेत धूर सोडतात. तो धूर आजूबाजूला असणाऱ्या सर्वांच्या फुफ्फुसात जातो व त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रेल्वेचे डबे आणि इतर ठिकाणी जेथे धूम्रपान करणारे आहेत किंवा मद्यपान करणारांचा मद्यपानाचा दर्प असतो अशा ठिकाणी थांबू नये. धूम्रपान करणाऱ्यांची आरोग्य तर धोक्यात असतेच परंतु त्यांच्यामुळे इतरांचे ही आरोग्य धोक्यात आणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? ते धूम्रपान करुन त्यांच्या भोवतालचे वातावरण दूषित होते ज्यामध्ये इतर निरोगी लोक श्वास घेतात. MHMar 252.1

तंबाखू खाण्याची सवय लहान मुले आणि तरुणांमध्ये अमर्यादित आहे आणि त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील पीढीच्या वाईट सवयीमुळे भावी पीढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. मानसिक अयोग्यता शारीरिक दुर्बलता अनियमित नाडीचे ठोके आणि अस्वाभाविक इच्छा असे सर्व स्वभाव मुलांमध्ये त्यांच्या पालकांकडूनच येतात आणि मुलांमध्ये वाढत जाणारी ही प्रवृत्ती पुढे जाऊन वाईट व्यवहार वाढत जातात. शारीरिक, मानसिक व नैतिक पतनासाठी तंबाखूचा वापर अधिक प्रमाणात जबाबदार आहे आणि हा एक चिंतेचा विषय आहे. MHMar 252.2

लहान वयामध्येच मुले तंबाखूचा वापर करीत आहेत. यामुळे शरीर अधिक दुर्बल होते. शरीरावर लहान वयामध्ये लवकर दुष्परिणाम घडतात. यामुळे मुलांचा विकास व्यवस्थित होत नाही. मेंदूसुद्धा अविकसितच राहतो व नैतिकरुपाने भ्रष्ट होतो. MHMar 252.3

परंतु या मुलांना व तरुणांना तंबाखूची वाईट सवयी विषयी व परिणामांविषयी कसे सांगावे कारण आई-वडील व शिक्षकच या पदार्थांचा स्वैर वापर करीत असतात. लहान मुले अजून त्यांच्या बालपणातून बाहेरसुद्धा पडत नाहीत तोच त्यांच्या हातात सिगारेट विडी दिसून येतात. त्या विषयी जर कोणी त्यांना सांगायला गेले तर ते म्हणतील की, “माझे बाबा कितीतरी वर्षे धूम्रपान करीत होते.” ते आणखी म्हणतात की “जर माझ्या संडे स्कूलमधील शिक्षकच धूम्रपान करतात तर आम्हाला कसला धोका आहे ?’ संयम चळवळीचे समर्थक मधील अनेक कार्यकर्ते तंबाखूच्या अधीन आहेत. तेव्हा असंयम वाढीपासून रोखण्यासाठी हे लोक कोणत्या शक्तिचा वापर करीत आहेत ?’ MHMar 252.4

जे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांना माझे निवेदन आहे की जर तुम्ही देवाच्या आज्ञांचे पालन करतात तर मग ख्रिस्ती या नात्याने तुम्ही अशा शरीरनाशक सवयी कशा काय बाळगता ? तंबाखू सारख्या पदार्थांचा वापर करुन शरीर दुर्बळ होते हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? शरीराबरोबर मानसिक आरोग्यसुद्धा ढासळते हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? यामुळे अनंत वास्तविकतेला समजून घेण्याची पात्रताही नष्ट होण्याच्या मार्गांवर येते. आपण दररोज परमेश्वराची भक्ति व स्तुति करीत नाही काय ? यावर परमेश्वराचा हक्क आहे आणि तुम्हांला संधी आहे. यामुळे तुम्हांला आशीर्वादाचा लाभ होतो. या लाभापासून तुम्हांला वंचित राहाण्यास बरे वाटते काय ? ज्यांना परमेश्वराची ओळख नाही त्यांना त्याची ओळख करुन देण्याचे तुमचे कर्तव्य आहे त्यापासून त्यांना तुम्ही दूर ठेवता काय ? MHMar 253.1

ज्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या हाती सोपविल्या आहेत त्याकडे तुमचे लक्ष आहे काय ? परमेश्वराचे खजिनदार या नात्याने तुम्ही त्याने दिलेल्या दानांचा वापर अशा व्यसनांवर खर्च करता काय ? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमचा पैसा जो या वायफळ गोष्टींवर खर्च केला आहे त्यावर बसून कधी हिशोब केला आहे काय ? या धनाचा हिशोब व ज्या धन्याने तुम्हांला जे धन दिले आहे त्यांचा वापर गरीबांना सहाय्य करण्यासाठी आणि त्याचे सुसमाचार इतरांना देण्यामध्ये किती प्रमाणात खर्च केला आहे ? MHMar 253.2

कोणाही मनुष्याला तंबाखूची मुळीच गरज नाही, परंतु लाखो लोक यासाठी आपले धन खर्च करुन स्वत: गरीब होत आहेत आणि त्यांची शरीरे ही आजारी होत आहेत. तंबाखूच्या व्यसनासाठी शरीर आणि पैशाचाही नाश होत आहे याची जाणीव होत नाही. आपण परमेश्वराने दिलेले शरीर आणि धनाचा सन्मान करणार नाही काय ? यासाठी तुम्ही दोषी आहात हे कधी समजणार ? “तुमचे शरीर, तुम्हांमध्ये वसणारा पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय ? आणि तुम्ही स्वत:च मालक नाही कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.” (१ करिथ ६:१९-२०). MHMar 253.3