Go to full page →

अध्याय ३१—आई MHMar 288

“मी ज्या ज्या आज्ञा दिल्या आहेत त्याप्रमाणे करा.” MHMar 288

जसे आई बाप तसेच बहुतकरून मुलेही असतात. आईबापाची शारीरिक अवस्था त्यांची भूक, स्वभाव आणि नैतिक प्रवृत्या थोड्या अधिक त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा उतरतात. MHMar 288.1

हेतू जितके उंच असतात तितकेच त्यांचे लक्ष्य चांगले असतात. जितकी उंची मानसिक व आत्मिक विवेक असतो त्यामध्ये आईबापांच्या शक्तिंचा विकास होतो. त्याच मापामध्ये ते आपल्या मुलांना तयार करु शकतात. त्यांच्यामध्ये जी सर्वात चांगल्या गोष्टी मिळतात. त्यांचा विकास करण्याकरवी माता व पिता आपल्या प्रभावाने एक उत्तम समाजाचा एक आराखडा तयार करु शकतात. आणि येणाऱ्या पीढीला उंच करण्याचे कार्य करतात. मातापित्यांना त्यांची जबाबदारी समजणे आवश्यक आहे. तरुणांना त्यांच्या पायामध्ये अनेक प्रकारच्या मोहांनी अडकविण्याचे फासे आहेत. अशा जाळ्यांनी समाज भरला आहे. लोकांची गर्दी त्यांच्या जीवनाचा स्वार्थ, कामुकता आणि त्याच आनंदात ते आकर्षित असतात. त्यांना तोच सुखाचा मार्ग दिसतो यामध्ये ते लपलेल्या धोक्यामध्ये अडकतात हे त्यांना समजत नाही किंवा त्या धोक्याच्या भयानकतेची त्यांना जाणीव नसते. भूक आणि वासनांची इच्छा पूर्तता करण्यामध्येच त्यांची उजनिष्ट होते. यामुळे आजच्या जगामध्ये आणि येणाऱ्या जगामध्ये करोडो लोक बेकार होतात. मातापित्यांना लक्षात ठेवायला हवे की त्यांच्या मुलांनी या सर्व कसोटींचा सामना करायला हवा. एवढेच नाही परंतु मुले जन्माला येण्याअगोदर ही तरतूद करायला हवी. यामुळे ते वाईटांवर सहज विजय मिळवतील. तशी शक्ति त्यांना प्राप्त होईल. MHMar 288.2

विशेषतः ही जबाबदारी आईवर असते. कारण तिच्या दूधावर बालकाचे पोषण होते. त्यावरच त्यांचा आकार येतो. ती त्यांना मानसिक आणि आत्मिक रुपानेही प्रभावित करते. तिचे विचार तिचे चारित्र्य त्यांच्यामध्ये निर्माण होते. योकेबेद ही एक इब्री आई होती ती विश्वासात दृढ होती. ती राजाच्या आज्ञेला घाबरली नाही’ (इब्री ११:२३) तिच्या करवी इस्राएलांची मुक्तता करणारा मोशे जन्माला आला. ती हन्नाच होती जी प्रार्थना, आत्मत्याग आणि स्वर्गीय प्रेरणेची नारी होती जिने शमुवेलाला जन्माला घातले तो स्वर्ग निर्देशित बालक होता. तो निर्दोष, न्यायी आणि इस्राएलाच्या पवित्र शाळेच्या संस्थापकाला तिने जन्म दिला होता. ती एक आलीशिबा होती जी नासरेथच्या मरीयेची नातलग होती. जो उद्धार कर्त्याच्या आगमनाची सूचना देणारा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची माता होती. MHMar 288.3