Go to full page →

आम्ही केलेल्या धार्मिक कार्यानसार नाही
तर त्याच्या दयेनुसार आमचे तारण केले MHMar 31

एका शताधिपतीचा दास आजारी पडला होता. रोममध्ये बाजारामध्ये दास विकेल व खरेदी केले जात असत आणि बहुतेकदा त्यांच्याशी क्रूरपणे वागले जात असे, परंतु हा शताधिपती आपल्या दासाबरोबर दयेचा व्यवहार करीत असे आणि त्याने बरे व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्याचा विश्वास होता की येशू मशीहा त्याला बरे करु शकतो. त्याने येशूला पाहिले नव्हते, परंतु त्याने येशू विषयी जे ऐकले होते त्यावर त्याने विश्वास ठेऊन प्रेरित होऊन आला होता. यहुदीयांच्या विधिकर्माने विचलित न होता त्याला ठाऊक होते की यहूद्यांचा धर्म त्याच्या धर्मापेक्षा उत्तम असा होता. ते राष्ट्रीय पक्षपात आणि घृणाच्या बाधेला कारण असल्यामुळे रोमी आणि यहूदिमध्ये वेगळेपण आले होते. त्याने परमेश्वराच्या सेवेचा सन्मान प्रदर्शित केला होता. परमेश्वराची सेवा करणाऱ्या यहूद्यांवर त्याने दया दाखविली होती. येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाविषयी त्याने ऐकले होते त्यानुसारच येशूच्या शिक्षणामध्ये आत्म्याच्या आवश्यकतेची पुर्तता होताना पाहिले होते. त्याने आत्मियतेने येशूच्या वचनावर लक्ष दिले होते, परंतु येशूजवळ येण्यासाठी त्याने स्वत:ला अयोग्य समजले. म्हणून त्याने यहूदी धर्माच्या वडीलांना त्याच्याकडे पाठवून विनंती केली की त्याच्या आजारी चाकराला बरे करण्याची विनंती करावी. त्याप्रमाणे वडील मंडळीने येऊन येशूला विनंती केली की आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. आणि त्यानेच आमच्यासाठी सभास्थान बांधून दिले आहे.” (लूक ७:४,५) MHMar 31.4

मग येशू त्याच्या घराजवळ येत असतानाच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्राला पाठवून त्याला म्हटले प्रभुजी श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही.” (लूक ७:६) MHMar 32.1

परंतु तरीही मुक्तिदाता आपल्या वाटेने चालत होता. आता शताधिपतीने संदेश दिला की, “प्रभुजी श्रम घेऊन नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे ही माझी योग्यता नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा म्हटले की तो जातो दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.” (लूक ७:७-८) MHMar 32.2

मी रोमी सामर्थ्याचा प्रतिनिधी आहे आणि शिपाई माझे अधिकार मानतात तसे तू सुद्धा त्या परमेश्वराचा प्रतिनिधी आहेस आणि सर्व सृष्टी तुझ्या आज्ञा पाळतात तू रोगाला दूर जाण्याची आज्ञा करतोस आणि तुझी आज्ञा मानली जाते. केवळ शब्द बोल आणि माझा चाकर बरा होईल. “येशू शताब्दि पतीला म्हणाला जा. तुझ्या विश्वासाप्रमाणे होवो आणि त्याचा चाकर त्याचवेळी बरा झाला (मत्तय ७:१३). MHMar 32.3

यहूदी वडील लोकांनी येशू समक्ष शताधिपतीची प्रशंसा केली की तो त्या योग्यतेचा आहे. कारण हा आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्या करिता सभास्थान बांधून दिले आहे, परंतु शताधिपती म्हणाला की “मी त्या योग्यतेचा नाही.” तरीही त्याने येशूला सहाय्य मागण्याची भीती बाळगली नाही. त्याने स्वत:च्या कार्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु येशूच्या दयेवर अवलंबून राहिला. त्याची जी गरज होती त्या सबबीवर टिकून होता. अशाप्रकारे प्रत्येक मनुष्य येशू जवळ येऊ शकतो. आपल्या स्वत:च्या धार्मिक कार्यामुळे नाही. कारण कोणीही मनुष्य स्वत:च्या धार्मिक कार्याने स्वत:चे तारण मिळवू शकत नाही. तर केवळ त्याची दयाच आपल्याला वाचवू शकते. (तीताला पत्र ३:५). तुम्हाला असे वाटते का की तुम्ही पापी आहात आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्याची इच्छा धरु शकत नाही. लक्षात ठेवा की ख्रिस्त या जगामध्ये आला तो पाप्यांना वाचविण्यासाठीच आला. आमच्या जवळ असे काहीच नाही की आम्ही ज्यामुळे परमेश्वराने आमचे ऐकावे आम्ही हक्काने मागणी करु, परंतु केवळ त्याच्या कृपेमुळेच आम्ही त्याच्याकडे कधीही आणि कोठेही विनंती करु शकतो आणि हीच गोष्ट आहे ज्यामुळे आमच्यासाठी त्याच्या मुक्ततेची शक्तिची मदतीची गरज आहे. आम्ही आमच्या स्वत:च्या भरवशाचा त्याग करुन केवळ कालवरीच्या क्रूसाकडे लक्ष केंद्रित करुा या आणि म्हणू या की, MHMar 32.4

“मी माझ्या हाती काही मोल आणले नाही
तर केवळ तुझ्या क्रूसाच्या आश्रयाला आलो आहे.” MHMar 33.1

“शक्य असेल तर असे कसे म्हणतोस ? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” (मार्क ९:२३). हाच विश्वास आहे जो आम्हांला स्वर्गाशी जोडतो आणि आम्हांला अंधाराच्या शक्तिशी सामना करण्याची शक्ति देतो. ख्रिस्तामध्ये परमेश्वर सर्व प्रकारच्या मोहांशी तोंड देण्याचे सामर्थ्य देतो. जे देवाचे लोक आहेत. त्या सर्वांना त्यांच्या विश्वासाप्रमाणे सर्व वाईट मोह व दष्ट शक्तिपासून वाचवितो. कोणत्याही वाईट व शक्तिशाली संकटापासून तो वाचवितो. MHMar 33.2

परंतु अनेक लोकांना वाटते की त्यांच्यामध्ये विश्वास कमी आहे म्हणून ते ख्रिस्तापासून दूर राहतात. या सर्व आत्म्यांना त्यांच्या अयोग्य आणि असहाय्य अवस्थेला आपल्या दयाळू मुक्तिदात्याच्या दयेवर सोडावे. स्वत:कडे पाहू नका, परंतु ख्रिस्ताकडे पाहा. जेव्हा ख्रिस्त लोकांमध्ये चालत होता, फिरत होता. लोकांना त्याने बरे केले होते, भुते काढली होती आणि आज तोच ख्रिस्त अगदी तसाच सामर्थ्यवान आहे. सर्व समस्या सोडविणारा आहे. तेव्हा जीवनाच्या झाडांच्या पानांसारखे त्याच्या वचनांना धरुन राहा. “जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. (योहान ६:३७). जेव्हा तुम्ही त्याच्याकडे येतात तेव्हा विश्वास ठेवा की तो आपल्या वचनानुसार तुमचा स्वीकार करतो कारण त्याने भरवसा दिला आहे की तुमचा कधी नाश होणार नाही. कधीच नाही, परंतु देव आपणावरच्या स्वत:च्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. (रोम ५:८). MHMar 33.3