Go to full page →

परमेश्वराची योजनाच सर्वात्तम MHMar 373

आमच्या योजना नेहमी परमेश्वराच्या योजना नसतात. परमेश्वर पाहातो की जे काय तो आमच्यासाठी करतो ते आमच्या हितातेच असते जसे त्याने दाविदासाठी केले. तसे तो आमच्या सर्व चांगल्या मनीषा मनाई करतो. परंतु एका गोष्टी विषयी आम्ही निश्चीत आहो की जो कोणी इमानदार व विश्वासू आहे त्यांना परमेश्वर त्यांच्या कार्यामध्ये आशीर्वाद व यश देतो. आणि आपले कार्य वाढविण्यासाठी त्यांचा वापर करुन घेतो. परमेश्वर हे पाहतो की त्यांची इच्छा पूर्ण करणे हे त्यांच्या हितासाठी नाही. तेव्हा त्यांनी मनाई केलेल्या बदल्यात त्यांना दसरे कार्य तो त्यांना देतो. कारण आपल्यावरील प्रेमाखातर परमेश्वर आपल्याला जास्त समजतो व ओळखतो. जेव्हा आपण स्वार्थीपणाने आपल्या महत्त्वाकांक्षा पूऱ्या करु पाहतो तेव्हा तो आपल्या या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करु देत नाही. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पवित्र कार्याला सोडून पुढे जाण्याची अनुमती परमेश्वर आपणास देत नाही. तसे पाहता ही लहानसहान कामेच आपल्याला मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक शिक्षण देतात. या करवी आपल्या योजना सफल होतात. म्हणजे परमेश्वराच्या योजना यशस्वी होतात. MHMar 373.1

परमेश्वरासाठी आम्हांला कधीही बलिदान देण्यास सांगितले नाही. अनेक गोष्टी ज्या परमेश्वराला आवडतात त्या आम्ही समर्पित कराव्यात, परंतु या गोष्टींचा त्याग करण्याकरवी आम्ही केवळ त्याच गोष्टी टाळाव्यात ज्या स्वर्गाच्या मार्गामध्ये अडथळे आणतात आणि या करवी परमेश्वर आम्हांला मोठा आशीर्वाद देण्याची तयार करीत आहे यात संशय नाही. ज्या रहस्यांनी आम्हांला येथे दुःखी आणि हताश केले आहे. भविष्यातील जीवनामध्ये याचे आम्हाला विश्लेषण केले जाईल. आम्हाला समजेल की ज्या गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना करीत होतो, परंतु त्यांची उत्तरे मिळाली नाहीत त्या प्रार्थनाच आम्हांला आशीर्वादच झाल्या होत्या. आम्हाला कोणतेही कार्य कितीही हीन वाटले, पवित्र समजून ते करावे. कारण परमेश्वराच्या सेवेचा तो एक भाग आहे. आमची रोजची प्रार्थना अशी असावी की हे प्रभु मी सर्वोत्तम प्रयत्न करण्यासठी मला सहाय्य कर, मला चांगले कार्य करण्यासाठी मार्गदर्शन कर. मला शक्ति आणि प्रसन्नता दे. मला मदत कर की मी आपले कार्य उद्धार कर्त्याच्या प्रेमाने त्याच्या सेवेप्रमाणे करावे. MHMar 373.2