Go to full page →

ओझे वाहण्याऱ्यां विषयीची सहानुभूती MHMar 382

अनेकांनी खूप कमी ओझी उचलली आहेत. त्यांच्या हृद्यांनी अति कमी दुःखे पाहिली आहेत. त्यांनी इतरांसाठी अति कमी त्रास किंवा समस्या भोगल्या असतील. कारण खरे ओझे उचलणाऱ्यांच्या समस्या किंवा कार्य ते समजू शकत नाहीत. जसे की एक बालक आपल्या थकलेल्या पित्याचे त्रास किंवा चिंता समजू शकत नाही त्याचप्रमाणे त्याचे ओझे वाहू शकत नाहीत. बालक आपल्या पित्याची समस्या आणि भयावर आश्चर्य प्रकट करु शकते. त्याच्यासाठी हे सर्व व्यर्थ होऊ शकते, परंतु जेव्हा त्याच्या जीवनामध्ये अनुभव येतात आणि जीवनाचे ओझे उचलण्याची त्याची वेळ येते तेव्हा तो आपल्या पित्याच्या मागील जीवनाकडे पाहतो आणि आतापर्यंत ज्या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या त्या समजतात. त्यांना जे कडू अनुभव आले होते त्याला दोषी ठरवितो. कारण दोषी ठरविणारा तूही त्याच गोष्टी करीतोस.” (रोम २:१). MHMar 382.3