Go to full page →

परमेश्वराबरोबर डोंगरावर MHMar 406

“वर डोंगरावर माझ्याकडे या.” परमेश्वर आम्हाला बोलवित आहे. यापूर्वी मोशे इस्त्राएलांना सोडविण्याचे माध्यम बनला. यासाठी त्याला डोंगरामध्ये चाळीस वर्षे एकटे राहावे लागले परमेश्वराशी बोलण्यासाठी. .....कडे परमेश्वराचा संदेश घेऊन जाण्याआधी जळत्या झुडूपातून परमेश्वर त्याच्याशी बोलला. परमेश्वराचा प्रतिनिधी होणे या नात्याने परमेश्वराचे नियम प्राप्त होण्याआधी परमेश्वराचे गौरव पाहण्यासाठी त्याला डोंगरावर बोलविण्यात आले. लोकांवर नियम लागू करण्याआधी परमेश्वराने डोंगरामध्ये नियम ठेवले होते. “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवित तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन.... परमेश्वर दयाळू व कृपाळू, मंद क्रोध दयेचा व सत्याचा सागर, परंतु अन्याय अपराध व पाप ह्यांची क्षमा न करणारा असा तो आहे.” (निर्गम ३३, २४:६-७). त्याचे हे जीवन व इस्त्राएल लोकांसाठी त्याचे कार्य समाप्त होण्याआधी परमेश्वराने त्याला सिनाय पर्वताच्या उंचावर बोलाविले. अशासाठी की त्याने वचन ..... देश पाहावा. त्या देशाचे वैभव पाहावे. MHMar 406.4

ख्रिस्ताचे शिष्यही आपल्या कार्यासाठी जाण्याआधी ख्रिस्ताने त्यांना डोंगरावर बोलविले. काही वेळ त्यांच्याबरोबर घालविण्याचे त्याने ठरविले. पँटिकॉस्टच्या दिवशी सामर्थ्याने भरण्या आधी शिष्यांनी उद्धारक त्याबरोबर डोंगरावर ती रात्र घालविली. गालील डोंगरावर त्यांची मुलाखत झाली. जैतुनाच्या डोंगरावर निरोपाचे दृश्य त्यांनी पाहिले. स्वर्गीय दूतांचे आश्वासन आणि माडीवरील खोलीमध्ये उपवास आणि प्रार्थनेत त्यांनी वेळ घालविला. येशू कोणत्याही मोठ्या परीक्षेला तोंड देण्या अगोदर प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर जात असे. तो आपल्या पित्याची प्रार्थना करुन रात्र घालवित असे. प्रेषितांचे अभिषेक करण्याआधी, डोंगरावरील प्रवचना अगोदर रुपांतर होण्या अगोदर आणि यहूद्यांच्या न्यायालयामध्ये व वधस्तंभावर जाण्याआधी या सर्व गोष्टी घडण्याआधी तो नेहमी डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी जात असे. MHMar 407.1